मंगळूरू (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवावर जिहादी संघटना एस्.डी.पी.आय.चा आक्षेप !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कार्यक्रम आयोजित करणार्‍यांवर
देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा !’ – जिहादी संघटना एस्.डी.पी.आय.चे हिरवे फुत्कार

  • १५ मिनिटांत ७५ कोटी हिंदूंना संपवण्याची धमकी देणार्‍या ओवैसींच्या चिथावणीखोर सभांविषयी अवाक्षरही न काढणारी धर्मांध एस्.डी.पी.आय. संघटना हिंदूंच्या गुरुपौर्णिमा महोत्सवावर आक्षेप घेते, हे लक्षात घ्या ! 
  • एस्.डी.पी.आय.ला कधी काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांची कृती देशद्रोही वाटली आहे का ? त्याविरोधात त्यांनी कधी आवाज का उठवला नाही ?

मंगळूरू (कर्नाटक) – संपूर्ण देशात अनेक बॉम्बस्फोट प्रकरणांत, तसेच विचारवंतांच्या हत्येच्या प्रकरणांत सहभागी असलेल्या सनातन संस्थेच्या नावाने एस्.डी.एम्. विधीज्ञ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. (उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अशा भूमिकेतून आरोप करणारी जिहादी संघटना एस्.डी.पी.आय.! पोलिसांनी याच संघटनेवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून या संघटनेवर बंदी घातली पाहिजे ! – संपादक) यात हिंदु राष्ट्र स्थापनेचे सूत्र मांडण्यात आले. हा कार्यक्रम राज्यघटनेच्या विरोधात असून देशाला मारक आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, असे हिरवे फुत्कार एस्.डी.पी.आय.च्या (सोशल डेमॉक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या) दक्षिण कन्नड जिल्हा समितीने सोडले. (हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी ही घटनेच्या कोणत्या कलमानुसार देशद्रोह आहे, हे एस्.डी.पी.आय.ने सांगावे ! राज्यघटनेचा आणि कायद्याचा कोणताही अभ्यास नसतांना अशी उथळ मागणी करणारी संघटना लोकशाहीविरोधीच आहे !  – संपादक)

१. एस्.डी.पी.आय.चे दक्षिण कन्नड जिल्हाध्यक्ष अफावुल्ला जोकट्टे म्हणाले की, भारत हा प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, तसेच सर्व धर्म, जाती आणि पंथ यांचे आचार अन् विचार सामावून घेणारा ‘विविधतेत एकता’ असलेला देश आहे. या देशात कोणत्याही एका धर्माचे राष्ट्र म्हणून मानण्यास घटनेने अनुमती दिलेली नाही. (एस्.डी.पी.आय.ने कधी इस्लामचे राज्य आणू पहाणार्‍या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना, तसेच काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांना विरोध केला आहे का ? कि ‘त्यांना राज्यघटनेच्या विरोधात आतंकवाद करण्याची अनुमती आहे’, असे एस्.डी.पी.आय.ला वाटते ? – संपादक) असे असतांनाही गुरुपौर्णिमेचा भाग म्हणून या देशाच्या घटनेच्या, तसेच धर्मनिरपेक्ष व्यवस्थेच्या विरोधात प्रजासत्ताक राष्ट्राला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस, तसेच जिल्हा प्रशासन यांनी तत्परतेने कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या, तसेच त्यांना कार्यक्रमासाठी जागा देणार्‍या ‘एस्.डी.एम्.’ विधीज्ञ महाविद्यालयाच्या कार्यकारी मंडळाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करून कायदेशीर कार्यवाही करावी.

२. अफावुल्ला जोकट्टे पुढे म्हणाले की, मंगळूरू येथे झालेला हा पहिला कार्यक्रम नव्हे. काही मासांपूर्वी सर्व सार्वजनिक ठिकाणी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यक्रमाची भित्तीपत्रके लावल्याविषयी एस्.डी.पी.आय.ने पोलीस, तसेच जिल्हा प्रशासन यांना भेटून सनातन संस्थेच्या देशविरोधी कार्यक्रमाकडे लक्ष वेधले होते; परंतु जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे असा कार्यक्रम पुन्हा झाला. (सनातन संस्था लोकशाही मार्गाने सर्वप्रकारच्या सरकारी अनुमती घेऊन कार्यक्रम करत आहे. त्यामुळे कोणी कितीही कार्यक्रम होऊ न देण्याची मागणी केली, तरी ती केवळ हिंदुद्वेषापोटीच आहे, हे सरकारी यंत्रणांच्याही लक्षात येते, हे एस्.डी.पी.आय.ने लक्षात ठेवावे ! – संपादक)

३. देशात, तसेच राज्यात घडलेल्या विचारवंतांच्या हत्या करणार्‍या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मंगळूरू येथेच शस्त्रास्त्र प्रशिक्षणही घेतल्याचे चौकशीत उघड झाले आहे. (अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांत धर्मांधांचा हात असल्याचे जाणणारे आणि तरीही त्याविषयी काहीही न बोलणारे सनातन संस्थेवर टीका करतात, यात नवल ते काय ? कोण कसे आहे, हे जनता ओळखून आहे ! – संपादक) तरीही अशा देशविरोधी संघटनेला कार्यक्रम करण्याची अनुमती पोलिसांनी दिलीच कशी ? पोलिसांनी याविषयी स्पष्टीकरण द्यावे. (असे कुठेही स्पष्ट झालेले नसतांना खोटे बोलून संस्थेची अपकीर्ती करणार्‍या एस्.डी.पी.आय.च्या विरोधात कायदेशीर  कारवाई करण्याचा सल्ला सनातन संस्था घेत आहे ! – संपादक)

(संदर्भ : दैनिक वार्ता भारती, कर्नाटक)