परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा साधनेचा विहंगम मार्ग दाखवला ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रसारक, सनातन संस्था

सोलापूर येथील गुरुपौर्णिमेत सद्गुरूंचे मार्गदर्शन

मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सोलापूर – भारताला प्राचीन काळापासून गुरुपरंपरा लाभली आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा साधनेचा विहंगम मार्ग दाखवला. त्यानुसार साधना करून १०२ साधक संत बनले आहेत, तर १ सहस्र २०९ साधक संत होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ‘काळावर ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले’, असे त्यांचे श्रेष्ठत्व आहे.  अशा महान गुरुदेवांच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि या पुढील काळात जोमाने गुरुसेवा करण्यासाठी बळ मागूया, असे मार्गदर्शन धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. येथील सुशील रसिक सभागृह येथे गुरुपौर्णिमा महोत्सवात त्या बोलत होत्या. या वेळी सनातनच्या संत पू. इंदिरा नगरकर (आजी) यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात