‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण यशस्वी होण्यासाठी इस्रोच्या अध्यक्षांची श्रीकृष्ण मठाला भेट

भारतीय वैज्ञानिकांपेक्षा स्वतःला अधिक शहाणे समजणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी
आणि अंनिसवाल्यांनी इस्रोच्या अध्यक्षांवर टीका केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

उडुपी (कर्नाटक) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रोच्या) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण यशस्वी व्हावे; म्हणून इस्रोचे अध्यक्ष के. सिवन् यांनी उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट दिली. के. सिवन् हे सहकुटुंब श्रीकृष्ण मठात आले होते. त्यांनी १५ जुलैला प्रक्षेपित होणार्‍या ‘चंद्रयान-२’चे उड्डाण यशस्वी व्हावे म्हणून विशेष प्रार्थना केली.

त्यानंतर त्यांनी पर्याय पलिमारु श्रीविद्याधीशतीर्थ स्वामीजी यांच्याकडून अनुग्रहित मंत्राक्षतांचा स्वीकार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात