सकाळी लवकर उठणार्‍या महिलांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’चा धोका अल्प रहातो

लंडन – सकाळी लवकर उठणार्‍या महिलांना अधिक घंटे झोपणार्‍या महिलांच्या तुलनेत स्तनाच्या कर्करोगाचा (‘ब्रेस्ट कॅन्सर’चा) धोका अल्प असतो, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणाअंती काढण्यात आला आहे. यात ‘यूके बायोबँक स्टडी’ आणि ‘ब्रेस्ट कॅन्सर असोसिएशन कन्झोर्टिअम स्टडी’ यांच्या माध्यमातून ४ लाखांहून अधिक महिलांचा अभ्यास करण्यात आला.

१. संशोधकांनी सकाळी किंवा सायंकाळी झोपणे, झोपण्याचे घंटे आणि निद्रानाश या गोष्टी विचारात घेत ‘मेंडेलियन रॅण्डोमिसेशन’ या तंत्राचा वापर करून हे सर्वेक्षण केले.

२. यात ७-८ घंट्यांपेक्षा अधिक झोप घेणार्‍या महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे आढळले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात