देशातील मद्यसेवन करणार्‍या १६ कोटी लोकांमध्ये ५ कोटी ७० लाख लोक व्यसनी

मद्यपान करणारे शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या संख्येत वाढ

देहली – देशातील १६ कोटी लोक मद्यसेवन करतात. त्यातील ५ कोटी ७० लाख लोकांना दारूचे व्यसन आहे, अशी माहिती सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या मद्यपानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे, असेही यातून उघड झाले आहे. (अधःपतनाकडे जलदगतीने जात असलेले भारतीय ! जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम ! – संपादक) या सर्वेक्षणाचा अहवाल नोव्हेंबर २०१९ मध्ये मिळेल, अशी माहिती सामाजिक आणि न्यायविकास मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली. ‘एम्स’ आणि ‘एन्डीडीसी’ (नॅशनल ड्रग्स डिपेंडन्सी सेंटर) यांनी ३६ राज्यांतील २ लाखांहून अधिक कुटुंबांचे हे सर्वेक्षण केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात