नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी नागाचे वास्तव्य असलेल्या वारुळाचे पूजन करण्याची प्रथा आहे. वारुळाच्या ठिकाणी नागाचे वास्तव्य असल्याने तेथील वातावरणावरही त्याचा सूक्ष्मातून परिणाम होत असतो. नागाचे वास्तव्य असलेल्या वारुळाचे सनातनच्या साधिकेने केलेले सूक्ष्म-परीक्षण या ठिकाणी मांडले आहे.

नागाचे वास्तव्य असलेल्या वारुळाचे सूक्ष्म-परीक्षण

१. ‘वारुळातील नागाच्या वास्तव्यामुळे वारुळाच्या ठिकाणी सत्त्वप्रधान वलय निर्माण होणे
१ अ. वातावरणात सत्त्वप्रधान कण कार्यरत असणे
२. रजोगुणी वलय वारुळात कार्यरत असणे
२ अ. वारुळात रजोगुणी कण कार्यरत असणे
३. वारुळाच्या भोवती शक्ती कार्यरत असणे
वारुळापेक्षा प्रत्यक्ष नागाचे पूजन करणे अधिक उपयुक्त ठरणे
वरील सर्व तत्त्वे वारुळात कार्यरत असली, तरीही प्रत्यक्ष नागाचे पूजन करणे अधिक उपयुक्त ठरते; कारण वारुळात नागाचे वास्तव्य आहे का, ते कळत नाही. वारुळात कार्यरत असणार्या स्पंदनांचे वातावरणात प्रक्षेपण होत नसल्याचे जाणवले. वारुळात नाग आणि नागीण यांच्या वास्तव्यातून मायिक स्पंदने कार्यरत होऊ शकतात.
– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा, आषाढ कृ. २, कलियुग वर्ष ५१११ (९.७.२००९)