नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करणे

नागपंचमीच्या दिवशी हळदीने किंवा रक्‍तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात आणि त्यांची पूजा करून त्यांना दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. नवनाग हे पवित्रकांचे नऊ प्रमुख गट आहेत. पवित्रके म्हणजे सूक्ष्मातीसूक्ष्म दैवी कण. पाटावर नऊ नागांच्या आकृत्या काढतांना, तसेच नागदेवतेचे पूजन करतांना सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, हे लेखाच्या आणि सूक्ष्म-चित्रांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल.

 

अ. नागपंचमीच्या दिवशी हळद अथवा रक्‍तचंदन याने पाटावर नऊ नागांच्या आकृत्या काढणे, या कृतीचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

नागांच्या नऊ आकृत्या
नागांच्या नऊ आकृत्या

१. ‘पाटावर हळद अथवा रक्‍तचंदन याने नागांच्या काढलेल्या नऊ आकृत्यांचे भावपूर्ण पूजन केल्यावर नागलोकातून नऊ नागतत्त्वे ‘प्रत्येक आकृतीमध्ये एक’, याप्रमाणे नागमोडी लहरींच्या स्वरूपात आकृष्ट होणे

१ अ. प्रत्येक नागाच्या नावाच्या उच्चारातून दिसलेला त्याच्याशी संबंधित लहरीचा रंग

नागाचे नाव

तत्त्वाचा दिसलेला रंग

१. अनंत गडद पिवळा
२. वासुकी धुरकट गुलाबी
३. शेष निळसर
४. पद्मनाभ तांबडा
५. कंबल काळसर
६. शंखपाल फिकट पिवळा
७. धृतराष्ट्र तांबडा
८. तक्षक लाल
९. कालिया मातकट काळसर

 

२. पाटावर काढण्यात आलेल्या हळदीच्या अथवा रक्‍तचंदनाच्या आकृत्यांमध्ये शक्‍ती कार्यरत होणे

२ अ. हळदीच्या साहाय्याने नागाच्या आकृत्या काढणे

हळदीमध्ये सत्त्वप्रधान पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हळदीच्या माध्यमातून अतिसूक्ष्म स्पंदने हळदीमध्ये आकृष्ट होऊन ती पूजन करणार्‍या स्त्रीला मिळतात.

२ आ. रक्‍तचंदनाच्या साहाय्याने नागाच्या आकृत्या काढणे

रक्‍तचंदनामध्ये सापाप्रमाणे अधिक शीतलता असते.

३. नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन केल्यामुळे परमेश्‍वरी तत्त्वाचा प्रवाह आकृत्यांमध्ये आकृष्ट होणे

३ अ. आकृत्यांमध्ये परमेश्‍वरी तत्त्वाचे वलय निर्माण होणे

४. ईश्‍वराकडून चैतन्याचा प्रवाह आकृत्यांमध्ये आकृष्ट होणे

४ अ. भावपूर्ण पूजनातून आकृत्यांमध्ये चैतन्याचे वलय निर्माण होणे

४ आ. वातावरणात चैतन्यकण पसरणे

५. ईश्‍वराकडून शक्‍तीचा प्रवाह आकृष्ट होणे

५ अ. शक्‍तीचे वलय निर्माण होणे

५ आ. शक्‍तीच्या वलयातून वातावरणात शक्‍तीच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होणे

५ इ. वातावरणात शक्‍तीचे कण पसरणे’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा, आषाढ कृ. १, कलियुग वर्ष ५१११ (८.७.२००९)

 

आ. नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करणे

नागाचे पूजन करतांना
नागाचे पूजन करतांना

१. ‘नागपंचमीच्या दिवशी नागाचे प्रत्यक्ष भावपूर्ण पूजन केल्यामुळे त्याच्याकडे परमेश्‍वरी तत्त्वाचा प्रवाह आकृष्ट होणे

१ अ. नागामध्ये परमेश्‍वरी तत्त्वाचे वलय निर्माण होणे

२. नागाकडे चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होणे

२ अ. नागात चैतन्याचे वलय निर्माण होणे

३. ईश्‍वराकडून शक्‍तीचा प्रवाह नागात आकृष्ट होणे

३ अ. नागात शक्‍तीचे वलय कार्यरत होणे आणि त्या वलयातून वातावरणात शक्‍तीच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होणे

३ आ. वातावरणात शक्‍तीच्या कणांचे प्रक्षेपण होणे

४. नागामध्ये शक्‍तीचे प्रमाण अधिक असणे आणि त्यामुळे त्या दिवशी नागाचे पूजन केल्यास पूजकाला शक्‍ती प्राप्त होणे

५. नागाच्या फण्याच्या ठिकाणी असणार्‍या आकड्यासारख्या चिन्हातून अधिक प्रमाणात शक्‍तीचे प्रक्षेपण होणे

६. नागाच्या शेपटीतून अल्प प्रमाणात शक्‍तीचे प्रक्षेपण होणे

७. नागातून प्रक्षेपित होणार्‍या शक्‍तीमुळे वाईट शक्‍ती दूर पळणे’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा, आषाढ कृ. ९, कलियुग वर्ष ५१११ (१६.७.२००९)

 

नागपंचमीच्या दिवशी आलेल्या अनुभूती

‘श्रावण शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५१११ (२५.७.२००९) या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेली नागपंचमीविषयीची माहिती वाचून त्याप्रमाणे मी हळदीने काढलेल्या नागांची पूजा केली. प्रत्येक नागदेवतेचे नाव घेऊन मी त्यांना प्रार्थना करत होते, तर प्रत्येक नागाच्या नावाबरोबर त्याचे वेगवेगळे रूप दिसले.

अ. अनंतनाग : श्रीविष्णूच्या मागे असलेला आणि बर्‍याच फण्यांचा असल्याचे जाणवले.

आ. वासुकीनाग : जीभ बाहेर काढलेला नाग दिसला.

इ. शेषनाग : स्वतःकडील लहान गोळा बाजूला ठेवून त्याने जीभ बाहेर काढली.

ई. शंखपालनाग : श्रीकृष्णाच्या चरणी बसलेला दिसला.

उ. तक्षकनाग : आमच्या घर बांधण्याच्या जागेत बसलेला दिसला.

ऊ. पद्मनाभनाग : एके ठिकाणी स्थिर असून पहुडलेला दिसला.

ए. कालियानाग : डोहातील पाणी चांगले करून ते पाणी आमच्याकडे ढकलत असल्याचे दिसले.

ऐ. धृतराष्ट्रनाग : आमच्या रहात्या घराच्या उंबर्‍याच्या खालील पायरीवर फणा काढून बसलेला दिसला. त्या वेळी प्रार्थना झाली, ‘दिरामध्ये आणि आमच्यामध्ये असलेला दुरावा नष्ट होऊ दे.’

ओ. कंबलनाग : आमच्या रहात्या घरात भिंतीच्या कडेने सळसळणारा काळा नाग दिसला. मी डोळे उघडून पूर्वजांसाठी प्रार्थना केली. पुन्हा डोळे मिटल्यावर तोच सळसळणारा काळा नाग दिसला. तेव्हा मला थोडी भीती वाटली.

पूजा पूर्ण झाल्यावर मी आरती करून नैवेद्य दाखवला. तेव्हा नमस्कार करतांना डोलणारा नाग दिसला. तो प्रसन्न वाटत होता. पूजा करतांना माझा भाव दाटून आला. पूजा पूर्ण झाल्यानंतर मला हलके आणि प्रसन्न वाटत होते. ती प्रसन्नता दिवसभर टिकून राहिली.’

– सौ. माधवी, बेळगाव

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment