रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात ‘राष्ट्रीय गुणकार्य आणि साधनावृद्धी शिबिरा’ला प्रारंभ

डावीकडून दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, पू. अशोक पात्रीकर आणि सद्गुरु नंदकुमार जाधव

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – जिल्ह्यांतील अध्यात्मप्रसाराच्या कार्याची आणि साधकांच्या साधनेची घडी बसवण्याच्या दृष्टीने सनातनच्या वतीने १७ जून या दिवशी येथे ‘राष्ट्रीय गुणकार्य आणि साधनावृद्धी शिबिरा’ला प्रारंभ झाला.

शिबिराच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्यानंतर सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि पू. अशोक पात्रीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, तसेच सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, पू. नीलेश सिंगबाळ, पू. रमानंद गौडा आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची उपस्थिती होती. शिबिराच्या प्रथम दिवशी साधकांची व्यष्टी साधनेची घडी बसवण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हे शिबिर २० जूनपर्यंत चालणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात