शास्त्रवचनानुसार ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशीला म्हणजे रविवार, १६ जून या दिवशी वटपूजन करावे !

‘काही पंचांग किंवा दिनदर्शिका यांमध्ये रविवार, १६ जून या दिवशी, तर काही पंचांग किंवा दिनदर्शिका यांमध्ये सोमवार, १७ जून या दिवशी वटसावित्री व्रत दिलेले असल्यामुळे कोणत्या दिवशी ‘वटपूजन’ करावे, असा जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. हा संभ्रम दूर होण्यासाठी ‘वटपूजन कोणत्या दिवशी करावे’, याविषयीची माहिती येथे दिली आहे.

सौ. प्राजक्ता जोशी

या वर्षी ज्येष्ठ पौर्णिमा सोमवार, १७.६.२०१९ या दिवशी दुपारी २.०२ वाजेपर्यंत (१४.०२ वाजेपर्यंत) असली, तरी वटपौर्णिमा मात्र ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशीला म्हणजे रविवार, १६.६.२०१९ या दिवशी दिली आहे. याचे कारण ‘सूर्यास्तापूर्वी ६ घटीपेक्षा अधिक व्यापिनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे’, असे शास्त्रवचन आहे. १६.६.२०१९ या दिवशी दुपारी २.०२ वाजेपर्यंत (१४.०२ वाजेपर्यंत) चतुर्दशी तिथी असून याच दिवशी पौर्णिमा तिथी सायंकाळी ६ घटींपेक्षा अधिक आहे; म्हणून पंचांगात रविवार, १६ जून या दिवशी वटपौर्णिमा दिलेली आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे १६.६.२०१९ या दिवशी दुपारी २.०२ वाजेपर्यंत चतुर्दशी तिथी असली, तरी त्याच दिवशी सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत, म्हणजे दुपारी १.३० वाजेपर्यंत कोणत्याही वेळी उपवासासह वटपूजन करावे. यापूर्वी शके १९३२, १९३८, १९३९ मध्ये वरीलप्रमाणेच वटपौर्णिमा होती आणि त्या वेळी शास्त्रवचनानुसार असा निर्णय देण्यात आला होता.’

(संदर्भ : दाते पंचांग)

– ‘ज्योतिष फलित विशारद’ सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष विभाग प्रमुख, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१४.६.२०१९)

वटपौर्णिमेच्या अधिक माहितीसाठी येथे click करा.

वटपौर्णिमेला हल्ली शहरासारख्या ठिकाणी वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करण्याची चुकीची प्रथा पडली आहे. वटवृक्षाचे पूजन करणे कसे योग्य आहे आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन का करू नये याचे अध्यात्मशास्त्रीय कारण आणि सूक्ष्म-परिक्षण वाचण्यासाठी ‘वटपौर्णिमेला वडाचे झाड आणि केवळ वडाची फांदी यांच्या पूजनातील भेद’ या लेखावर क्लिक करा !