वर्ष २०१९ मध्ये येणार्‍या गुरुपुष्यामृत योगांविषयी ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये !

सौ. प्राजक्ता जोशी

 

१. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय ?

गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास गुरुपुष्यामृत योग होतो. या दिवशी सुवर्ण खरेदी करणे आणि शुभकार्ये करणे, असा प्रघात आहे.

 

२. २०१९ या वर्षातील गुरुपुष्यामृत योग

या वर्षी तीन गुरुपुष्यामृत योग आहेत. त्यांच्या तिथी आणि त्यांचा कालावधी पुढे दिला आहे.

अ. ज्येष्ठ शुक्ल पक्ष तृतीया (६.६.२०१९) : रात्री ८.२८ (२०.४९) मिनिटांनंतर दुसर्‍या दिवशी सूर्योदयापर्यंत

आ. आषाढ शुक्ल पक्ष द्वितीया (४.७.२०१९) : सूर्योदयापासून दुसर्‍या दिवशी पहाटे २.३० पर्यंत

इ. आषाढ अमावास्या (१.८.२०१९) : सूर्योदयापासून दुपारी १२.१२ पर्यंत

 

३. वर्ष २०१९ मधील गुरुपुष्यामृत योगांचे वैशिष्ट्य !

या वर्षी होणार्‍या सर्व गुरुपुष्यामृत योगांत गुरु ग्रह वक्री असणार आहे. (ग्रह वक्री असणे, म्हणजे मागील राशीत भ्रमण करणे.)

अ. ६.६.२०१९ या दिवशी असलेला गुरुपुष्यामृत योग सूर्यास्तानंतर चालू होऊन सूर्योदयाला संपतो.

आ. १.८.२०१९ या दिवशी क्षयतिथी, तसेच अमावास्या ही तिथी आहे.

सुवर्ण खरेदी करण्यासाठी जून आणि ऑगस्ट या मासांतील हे गुरुपुष्यामृत योग फारसे लाभदायक नाहीत.

इ. जुलै मासातील गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभप्रद आहे.

हे सर्व गुरुपुष्यामृत योग साधनेसाठी अनुकूल आहेत; कारण ते अमावास्येच्या जवळ आणि अमावास्येला आहेत. अमावास्या आणि पौर्णिमा यांच्या २ दिवस आधी, त्या दिवशी आणि नंतरचे २ दिवस आध्यात्मिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी साधकांनी गुरुपुष्यामृत योगावर सुवर्ण खरेदी करण्यापेक्षा अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे !

– ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी (महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ज्योतिष विभागाच्या प्रमुख आणि अंकशास्त्र प्रवीण) (२०.५.२०१९)