‘फेसबूक’द्वारे सनातन संस्थेविषयी मानहानीकारक माहिती प्रसारित करणार्‍या समाजकंटकांच्या विरोधात नंदुरबार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !

नंदुरबार – गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटकांकडून फेसबूकच्या माध्यमातून सनातन संस्थेविषयी खोटी, मानहानीकारक आणि प्रक्षोभक माहिती प्रसारीत केली जात आहे.

ही माहिती सनातन आणि अन्य एक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांमध्ये अपसमज अन् तेढ निर्माण करणारी आहे. अशी प्रक्षोभक आणि मानहानीकारक माहिती प्रसारित करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर भारतीय दंड संहिता कलम १५३ अ, ११७ आणि अन्य कलमांन्वये त्वरित गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात यावी.

‘लोकसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला सामाजिक प्रसारमाध्यमांवरून सनातनची मानहानी करणारे ‘ट्रेन्ड’ (ट्रेन्ड म्हणजे टिव्टरवर एखादा विषय प्रसारित करून त्याविषयी मतप्रवाह तयार करणे) प्रसारित करणे, हे कारस्थान असून हा सर्व प्रकार संशयास्पद वाटत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित आरोपीला अटक करून योग्य ती शिक्षा करण्यात यावी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात यावेत’, अशा आशयाची तक्रार नंदुरबारचे श्री. जितेंद्र परशराम राजपूत यांनी शहर पोलीस ठाण्यात नुकतीच प्रविष्ट केली आहे.

समाजकंटकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि
सनातन संस्था यांच्याविषयी प्रसारित केलेली अवमानकारक माहिती

१. कुठं एक आश्रमातून बाहेर न पडणारी, कधीही लोकांना न भेटणारी व्यक्ती विष्णूचा अवतार म्हणे ! लायकी आहे का त्याची ?

२. मी राक्षस आहे. आठवले तर विष्णूचा अवतार आहेत ना ? भेट झाल्यावर माझ्यामधला राक्षस निघून जाईल !

३. ज्या तथाकथित हिंदुत्ववादी संस्थेमध्ये श्रीशिवछत्रपती-श्रीशंभूछत्रपती यांचे विचार नाही, त्या संस्थेच्या नावातले ‘सनातन’ हे केवळ हिंदूंना फसवायला वापरले जाते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात