अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा तृतीय दिवस

हिंदु राष्ट्र आणि प्रसारमाध्यमे : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पत्रकार आणि संपादक यांचे संघटन

 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधीच्या संख्येने प्राणार्पण करणार्‍या
हिंदूंसाठी स्वतंत्र राष्ट्र का नाही ? – अधिवक्ता राकेश मिश्रा, पाटणा, बिहार

वर्ष १८५७ पासून वर्ष १९४७ पर्यंत जो स्वातंत्र्यलढा दिला गेला. त्यामध्ये एकूण ८ लक्ष ३७ सहस्र ७७२ जणांनी प्राणांची आहुती दिली. त्यामध्ये केवळ १० सहस्र ७२२ मुसलमान होते. जर १० सहस्र मुसलमानांसाठी स्वतंत्र राष्ट्र होऊ शकते, तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधीच्या संख्येने प्राणार्पण करणार्‍या हिंदूंसाठी हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ?

बिहारमध्ये एकही नियतकालिक धार्मिक नव्हते. हे लक्षात आल्यावर मी गेल्या ५ वर्षांपासून एक धार्मिक नियतकालिक काढत आहे. त्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयीची वृत्त देत आहे.

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न उधळून लावणारे अधिवक्ता राकेश मिश्रा !

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न उधळून लावण्याच्या प्रयत्नांविषयी राकेश मिश्रा म्हणाले, ‘‘पाटण्याजवळ एका गावामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी एक ख्रिस्ती प्रचारक आले होते. धनाचे आमीष म्हणून त्यांनी त्यांच्यासह २ लाख रुपये आणले होते. मी त्यांच्यासह अनौपचारिक बोलत होतो. त्या चर्चेमध्ये मी त्यांच्यासह बायबलविषयी ४ घंटे वादविवाद केला. शेवटी ते चिडून म्हणाले, ‘‘तुमची जात काय आहे ?’’ मी म्हणालो, ‘‘जेव्हा समाजाचे रक्षण करायचे असते, तेव्हा मी क्षत्रिय असतो. जेव्हा स्वतःची शारीरिक कष्टाची कामे करतो, तेव्हा शूद्र असतो. जेव्हा काही समाज शिक्षित करण्याचे काम करतो, तेव्हा ब्राह्मण असतो आणि जन्मानुसार विचार केला, तर मी हिंदु आहे.’’ हे ऐकल्यानंतर तो ख्रिस्ती प्रचारक तेथून निघून गेला आणि त्या गावातील ६०० हिंदु परिवार धर्मांतरित होण्यापासून वाचले.

 

गोरक्षकांच्या समर्थनार्थ सत्ताधार्‍यांनी पुढे आले पाहिजे !
– अधिवक्ता सुधाकर चपळगावकर, निवृत्त जिल्हा न्यायाधीश

 

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या यज्ञात मला समिधा देण्याची संधी मिळणे,
हे माझे भाग्य असेल ! – आनंद श्रीवास्तव, गायत्री परिवार, छत्तीसगड

भारत हा ऋषिमुनींचा देश असून येथे अनेक महात्मे आणि ऋषी यांनी जन्म घेतला आहे. परशुरामाच्या पवित्र भूमीत हे अधिवेशन होत आहे. या भूमीत स्थापन झालेल्या सनातन आश्रमात राहून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनेक संत तपस्या करत आहेत. या यज्ञात मला समिधा देण्याची संधी मिळाली, तर माझे ते सौभाग्य असेल. गायत्री परिवाराचे संस्थापक पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी ३ सहस्र २०० ग्रंथांचे लिखाण केले आहे. या ग्रंथांमध्ये संस्कृती, नैतिक आणि बौद्धिक क्रांती यांविषयी विपूल ज्ञान उपलब्ध आहे.

 

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रसारमाध्यमांमधून लोकचळवळ उभी करणे आवश्यक !
– अरविंद पानसरे, महाराष्ट्र प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

 

न्यायप्रणाली, पोलीस आणि प्रशासन यांची हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात
मूक भूमिका का ? – वैदेही ताम्हण, संपादिका, आफ्टरनून व्हॉईस

कथित विचारवंतांच्या हत्या प्रकरणी आरोपींवर बक्षीस घोषित करणे, हे अन्वेेषण यंत्रणांचे अपयश !

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणांत सनातन संस्थेचे नावे घेतले जाते. त्यांना कट्टरतावादी ठरवून प्रसारमाध्यमांतून चर्चेची गुर्‍हाळे चालवली जातात. ‘या प्रकरणात मोठा विरोधाभास आहे’, हे पत्रकार म्हणून मी अनेक वर्षे पहात आहे. या प्रकरणी अटक झालेल्यांना अद्याप कोणतीही शिक्षा झालेली नाही. अटक झालेले प्रत्यक्षात सनातन संस्थेचे साधक आहेत कि नाहीत, हे समजून घेण्याची कोणाची इच्छा नाही. या हत्यांच्या प्रकरणांत माहिती देण्यासाठी अन्वेषण यंत्रणांनी लाखो रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. अन्वेषण यंत्रणांना इतके अपयश आले आहे का की, त्यांना पुराव्यासाठी बक्षिसाची घोषणा करावी लागते ?