अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अंतर्गत एक दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’

हिंदु राष्ट्रासाठी सोशल मीडियाद्वारे
वैचारिक योद्ध्यांची निर्मिती करूया ! – श्रीमती रितु राठौड, देहली

डावीकडून श्री. प्रदीप वाडकर, श्री. टी.एन्. मुरारी, श्री. रोहित काचरू, श्रीमती मिनाक्षी शरण आणि श्रीमती रती हेगडे

रामनाथी (गोवा) : हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात आवाज उठवणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. काळानुसार आपल्याकडे जी साधने आहेत, त्यांचा उपयोग करून हिंदु राष्ट्राची संकल्पना लोकांपुढे मांडली पाहिजे. सध्याच्या काळात न्यायालये, विद्यापीठ यांपासून प्रत्येक ठिकाणी डाव्या विचारसरणीच्या लोकांचा पगडा आहे. याला विरोध करून हिंदु राष्ट्राच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी ट्विटर,फेसबुक आणि ‘व्हॉटस् अ‍ॅप’, अशा सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर केला पाहिजे. सामाजिक माध्यमांच्या रूपाने हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी लढणार्‍या वैचारिक योद्ध्यांची निर्मिती करून त्या माध्यमातून लढा उभारावा, असे आवाहन देहली येथील सामाजिक माध्यमांद्वारे धर्मप्रसार करणार्‍या श्रीमती रितू राठौड यांनी केले. त्या 2 जून या दिवशी श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या पाचव्या दिवशी 1-दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. हिंदु जनजागृती समितीचे सोशल मीडिया समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी स्वागत आणि प्रस्तावना केली. ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’साठी भारत, तसेच बांगलादेश येथून 250 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले आहेत.

डावीकडून श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, श्री. रमेश शिंदे, पू. निलेश सिंगबाळ आणि बोलताना श्रीमती रितु राठोड

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात आवाज उठवणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. काळानुसार आपल्याकडे जी साधने आहेत, त्यांचा उपयोग करून हिंदु राष्ट्राची संकल्पना लोकांपुढे मांडली पाहिजे. सध्याच्या काळात न्यायालये, विद्यापीठ यांपासून प्रत्येक ठिकाणी डाव्या विचारसरणीच्या लोकांचा पगडा आहे. साम्यवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा प्रतिवाद करण्यासाठी सनातन हिंदु धर्मनिष्ठ विचार सामाजिक प्रसारमाध्यमांतून (‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून) प्रसारित व्हायला हवा. त्याचा प्रभाव पडून सरकार, पोलीस-प्रशासन यांच्याकडून हिंदूंवर होणार्‍या अन्यायाची नोंद घेतली जाते. ‘हिंदु राष्ट्र’ ही एक विचारसरणी आहे. सर्व हिंदू हे ऋषीमुनींचे वंशज आहेत. हिंदु संस्कृती नदीशी जोडलेली आहे, अरबस्तानसारख्या वाळवंटाशी नाही. ‘मुंबई येथे एका अनुसूचित जातीतील मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार करण्यात आला होता; पण ‘धार्मिक दंगे होतील’ या कारणाने पोलीस या प्रकरणी पीडित मुलीच्या आईची तक्रार नोंदवून घेत नव्हते.’ याविषयी ट्विटरवर आवाज उठवल्यावर पोलिसांना याची नोंद घेणे भाग पडले. सद्यःस्थितीत कर्नाटकमध्ये हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या बाजूने लिखाण करणारे लेखक, संपादक, तसेच विचारवंत यांना दडपून कारागृहात टाकण्यात येत आहे. ट्विटर, फेसबूक आणि ‘व्हॉटस् अ‍ॅप’, अशा सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करून हिंदु राष्ट्रासाठी लढणार्‍या वैचारिक योद्ध्यांची निर्मिती करून त्या माध्यमातून लढा उभारावा.

 

सामाजिक माध्यमांवर होणार्‍या माहितीची खात्री करूनच त्याचा प्रसार करा !
– श्रीमती रती हेगडे, सहसंपादिका, ‘इंडस स्क्रोल डॉट कॉम’ संकेतस्थळ, मुंबई

श्रीमती रती हेगडे, सहसंपादिका, ‘इंडस स्क्रोल डॉट कॉम’ संकेतस्थळ, मुंबई

इंग्रज भारतात आल्यानंतर हिंदूंसमोर केवळ ‘सांताक्लॉज’, ‘ख्रिसमस ट्री’, अशा प्रकारची ख्रिस्ती प्रतिके ठेवण्यात आली. यामुळे गेल्या तीन पिढ्यांसमोरील हिंदूंचे आदर्श आणि प्रतिके नाहीशी झाली. त्यामुळे मुलांना लहानपणापासून हिंदूंची संस्कृती, धर्म यांच्या संदर्भातील पंचतंत्र,महाभारत अशांमधील गोष्टी जाणीवपूर्वक सांगा. सामाजिक माध्यमांत अनेक खोट्या गोष्टी प्रसारित होतात, ज्या आहे तशा प्रसारित केल्यास आपली विश्‍वासार्हता अल्प होऊ शकते. तरी सामाजिक माध्यमांवर होणार्‍या माहितीची खात्री करूनच त्याचा प्रसार करा, असे आवाहन मुंबई येथील ‘इंडस स्क्रोल डॉट कॉम’च्या सहसंपादिका श्रीमती रती हेगडे यांनी केले. या वेळी मुंबई येथील मीनाक्षी शरण म्हणाल्या, ‘‘ख्रिस्ती आणि मुसलमान यांनी हिंदु संस्कृतीवर आक्रमण केले, त्यामुळे सत्य इतिहास नाहीसा झाला. हिंदूंनी याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय संस्कृतीची सत्य आणि ऐतिहासिक माहिती सामाजिक माध्यमांद्वारे लोकांसमोर आणली पाहिजे.’’

 

साम, दाम, दंड आणि भेद वापरून सनातन हिंदु धर्माची रेष मोठी करा ! – मीनाक्षी शरण

मीनाक्षी शरण

इंग्रजांनी भारतियांची शिक्षणपद्धत उद्ध्वस्त केली. त्यामुळे हिंदूंचे सनातन हिंदु धर्माशी असलेले नाते हळूहळू समाप्त होऊ लागले. जेव्हा अमेरिका, युरोप आणि अरब हे असभ्य आणि असांस्कृतिक वातावरणात होते, तेव्हा भारत वैभवाच्या शिखरावर होता. आज सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांविषयीचे खरे ज्ञान सहजतेने मिळत नाही. जेव्हा याविषयी ‘गूगल सर्च’ केले जाते, तेव्हा मिळणारी माहिती ही बर्‍याच वेळा विकृत व्यक्तीने ‘पोस्ट’ केलेली असते. अशा परिस्थितीत सत्य इतिहास, तसेच सनातन संस्कृती यांविषयी जाणून घेणे आणि सामाजिक माध्यमांद्वारे लोकांसमोर आणणे आवश्यक आहे. मोगल, इंग्रज यांनी भारतावर अनेक वर्षे आक्रमणे केली, तरी हिंदु धर्माची परंपरा सहस्रो वर्षांची आहे. या प्राचीन परंपरेचे हिंदू पाईक आहेत. त्याचा अभिमान बाळगला आणि त्याविषयी अभ्यास केला, तर काही शेकडो वर्षांत झालेल्या आक्रमणांच्या विरोेधात लढणे आणि पुन्हा भारतीय संस्कृतीला प्रतिष्ठा मिळवून देणे, हे कठीण नाही. साम, दाम, दंड आणि भेद वापरून सनातन हिंदु धर्माची रेष मोठी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ख्रिस्ती आणि मुसलमानांनी हिंदु संस्कृतीवर आक्रमण केले, त्यामुळे सत्य इतिहास नाहीसा झाला. हिंदूंनी याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय संस्कृतीची सत्य आणि ऐतिहासिक माहिती सामाजिक माध्यमांद्वारे लोकांसमोर आणली पाहिजे.

 

सर्व हिंदूंनी मिळून काश्मीरचा लढा लढला पाहिजे !
– रोहित काचरू, ग्लोेबल काश्मिरी पंडित डायसपोरा, पुणे.

रोहित काचरू, ग्लोेबल काश्मिरी पंडित डायसपोरा, पुणे.

काश्मीर हा भारतमातेचा मुकूट आहे. त्यामुळे काश्मीर मिळवल्याशिवाय देशात हिंदु राष्ट्र येणार नाही. काश्मीरच्या फुटीरतावाद्यांना ५० हून अधिक मुसलमान राष्ट्रांचा पाठिंबा आहे. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर रेटून खोटे बोलतात; मात्र आम्ही सत्यही जगासमोर मांडत नाही. आम्ही अमेरिका, जर्मनी आदी देशांच्या राजदूतांना भेटून त्यांच्या समोर काश्मीरचा विषय मांडला आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये काश्मिरी हिंदूंच्या वतीने आम्ही संयुक्त राष्ट्रामध्ये याविषयीचा प्रस्ताव मांडणार आहोत. काश्मिरी हिंदूंनी पैशासाठी काश्मीरमधून पलायन केले नाही, तर जिहादी आतंकवादामुळे होणारा नरसंहार टाळण्यासाठी आणि धर्म वाचवण्यासाठी काश्मीर सोडले आहे. काश्मीरमधील आणि देशातील अन्य हिंदू वेगवेगळे नसून एकच आहेत. त्यामुळे सर्वांनी मिळून काश्मीरचा लढा लढला पाहिजे. ‘ग्लोबल काश्मिरी डायसपोरा’च्या माध्यमातून काश्मीर भारताशी जोडला जाण्यासाठी ‘इंडिया फॉर काश्मीर’ ही मोहिमही राबवण्यात येणार आहे. कलम ३७० रहित होऊन जेव्हा देशभरातील हिंदू काश्मीरमध्ये येतील, तेव्हा धर्मांधांना पळता भुई थोडी होईल.

धर्मासाठी प्राणाचा त्याग करण्यास सिद्ध असणारे काश्मिरी हिंदू !

मार्गदर्शनामध्ये ‘जिहादी आतंकवादामुळे हिंदूंमध्ये निर्माण झालेले भय’ यांविषयी अनुभव सांगतांना श्री. रोहित काचरू म्हणाले, ‘‘मी लहान असतांना आमच्या आई-बहिणी केरोसिनचा डब्बा घेऊन झोपत असत. धर्मांधांचा जथ्था जेव्हा मध्यरात्रानंतर जेव्हा दार वाजवेल, तेव्हा केरोसिन आपल्या अंगावर ओतून घ्यायचे आणि धर्मांधांपासून वाचवायचे’’, अशी त्यांची भावना असायची.

 

राक्षसी वृत्तीच्या लोकांनी शबरीमला या आध्यात्मिक भूमीला
युद्धभूमीचे स्वरूप आले ! – श्री. टी.एन्. मुरारी, तेलंगण राज्यप्रमुख, शिवसेना

न्यायालयाच्या निर्णयाच्या निमित्ताने धर्मरक्षणासाठी सहस्रो हिंदू रस्त्यावर उतरले. या निमित्ताने हिंदूसंघटन तरी झाले. आम्ही धर्मरक्षणाचा संकल्प करून कार्यरत आहोत. सरकारने तिहेरी तलाकच्या संदर्भात अध्यादेश आणला; पण कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा असलेल्या शबरीमला येथील मंदिराच्या परंपरांचे रक्षण करण्यासाठी मात्र अध्यादेश काढला नाही.

धर्मकार्य करणार्‍यांना दिशा देण्याचे कार्य गुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) करत आहेत ! – श्री. टी.एन्.मुरारी

आज धर्मकार्याच्या तळमळीपोटी शेकडो युवक रस्त्यावर उतरले आहेत; पण त्यांना कुठे जायचे ते कळत नाही. त्यांना दिशा देण्याचे कार्य गुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) करत आहेत.

अधिवेशनाच्या निमित्ताने #WeSupportPunalekar हा ट्विटर ट्रेंड देशात चौथ्या स्थानी होता, तर #SocialMediaForHinduRashtra हा ट्विटर ट्रेंड अधिवेशनाच्या निमित्ताने चालवण्यात आला.

 

सोशल मिडिया कॉनक्लेव्ह चर्चासत्र

सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे मंदिरांचे रक्षण करण्याचा धर्मप्रेमींचा निश्‍चय !

‘सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे हिंदु राष्ट्र संकल्पनेचा प्रसार’ या विषयावर घेण्यात आलेल्या गटचर्चेत ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, देहली, उत्तरप्रदेश, तेलंगण, आंधप्रदेश येथून आलेल्या धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात जागृती आणि मंदिरांचे रक्षण करण्याचा निश्‍चय धर्मप्रेमींनी केला. प्रथम ‘सोशल मिडिया कॉन्क्लेव्ह’प्रमाणे कर्नाटक येथे ५, नांदेड येथे १ आणि पुणे येथे १ अशा एकूण ७ ठिकाणी कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्याचे, तसेच प्रत्येक मासात ऑनलाईन कार्यशाळा घेण्याविषयीही ठरवण्यात आले. या कार्यशाळांत माध्यमांतून हिंदु राष्ट्राची संकल्पना, धर्मशिक्षण यांचा प्रसार करण्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांविषयी तांत्रिक आणि कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सामाजिक ‘पोस्ट’ सिद्ध करणे, त्यांचे भाषांतर करणे यांसाठी धर्मप्रेमी सहभागी होणार आहेत. सनातन हिंदु धर्माचा व्यापक स्तरावर प्रसार करणे आणि धर्मविरोधी विचारांचे खंडण करणे यासंदर्भात सौ. रितु राठोड, सौ. रती हेगडे, सौ. मीनाक्षी शरण आणि श्री. रोहित काचरू मार्गदर्शन करणार आहेत.

क्षणचित्र :

सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे होणार्‍या धर्मप्रसाराविषयी जाणून घेण्यासाठी गोंदिया येथील पू. महंत श्रीरामज्ञानीदासजी महाराज आणि छत्तीसगड येथील सिंधी समाजाचे डॉ. संतश्री पू. युधिष्ठिरलालजी महाराज अन् त्यांचे अनुयायी स्वत:हून सहभागी झाले होते.

 

सामाजिक प्रसारमाध्यमांच्या वापरापर्यंत मर्यादित न रहाता
हिंदु राष्ट्राच्या विचाराची प्रभावी मांडणी करणारे अभ्यासू वक्ते बना !
– सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

१. ‘‘सध्या साम्यवादी लोक आणि त्यांच्या हाताखालील प्रसारमाध्यमे त्यांचे विचार हिंदूंवर लादत आहेत. या विचारांचे खंडण करणारे सनातन धर्मातील विचार ‘सोशल मीडिया’द्वारे पोचवायला हवेत. याने फलनिष्पत्ती वाढू शकते.

२. कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून एकत्र आल्याने आपल्यात धर्मबंधुत्व निर्माण झाले आहे. आपापल्या ठिकाणी स्थानिक स्तरावर हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांनाही यात जोडावे. सामाजिक प्रसारमाध्यमांवरील धर्मविरोधी विचारांचे चांगल्या प्रकारे खंडण करणारे आणि कायदेशीर साहाय्य मिळण्यासाठी स्थानिक अधिवक्ते यांनाही जोडावे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय समोर ठेवून हे कार्य केल्यास अल्प वेळात आणि अल्प शक्तीत यश मिळू शकते. या संघटनातूनच ज्ञानशक्तीचे कार्य होऊ शकते.

३. हिंदूंवरील अन्यायाविषयीची सत्यस्थिती कळू लागल्याने स्वयंप्रेरणेने कार्य करणार्‍या युवकांत तंत्रकुशलता निर्माण करून त्याद्वारे हिंदुत्वाचे कार्य करणारी नवी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत.’’

 

साम्यवाद्यांचे पितळ उघडे करण्यात सामाजिक प्रसारमाध्यमे यशस्वी !
– रंजित वाडियाला, सदस्य, ‘शिवशक्ती’ संघटना, विशाखापट्टणम्

१. सध्या एखादे वृत्त पोचवण्यासाठी पुस्तक, वृत्तपत्रे, दूरदर्शन आदी माध्यमे मागे पडली असून त्यांची जागा प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. वृत्त पोचवणार्‍या या माध्यमाकडे मोठी शक्ती असते. ती लोकांना दिशा देण्याचे कार्य करते. साम्यवादी लोकांनी या प्रभावी माध्यमाची शक्ती आधीच लक्षात घेऊन ती कह्यात घेतली. हे प्रभावी माध्यम सध्या ४-५ संघटनांकडे असून त्या देशातील करोडो लोकांना नियंत्रित आणि प्रभावित करत आहेत. यावर सामाजिक प्रसारमाध्यमे हे वैचारिक शस्त्र आहे. साम्यवाद्यांचे पितळ उघडे करण्यात सामाजिक प्रसारमाध्यमांना मोठे यश आले आहे.

२. सामाजिक प्रसारमाध्यमांतून आपण जे काही ‘पोस्ट’ करू त्या विषयाचा आधी अभ्यास करा आणि मग मत मांडा. त्यामुळे लोकांमध्ये आपल्याविषयी विश्‍वास निर्माण होतो. सामाजिक प्रसारमाध्यमांत स्वत:ची प्रतिमा सिद्ध करणे आवश्यक आहे. कोणाला पालटण्याचा प्रयत्न न करता खर्‍या गोष्टी मांडायला हव्यात. त्यामुळे लोक आपोआप आपल्याकडे वळतात.

 

सामाजिक प्रसारमाध्यमांतील लिखाण नाविन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाचे बनवणे
आवश्यक ! – अजय शर्मा, अपवर्ड, सहसंस्थापक अजय शर्मा, अपवर्ड, सहसंस्थापक

भारतातील प्रसारमाध्यमे डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या कह्यात आहेत. त्यामुळे तेथे हिंदु धर्माला योग्य प्रतिनिधीत्व मिळत नाही आणि हिंदु संस्था अन् संघटना या मुख्य प्रवाहापासून लांब रहातात. त्यामुळे हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधातील हिंदूंचा वैचारिक प्रतिकार न्यून पडतो. अशा स्थितीत हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांवर अवलंबून न रहाता सामाजिक प्रसारमाध्यमांतील विचार जगासमोर मांडले पाहिजे. जगात आपले विचार स्वीकारले जाण्यासाठी आपण सामाजिक प्रसारमाध्यमांतून नाविन्यपूर्ण आणि जागतिक दर्जाचे लिखाण करणे आवश्यक आहे. या समवेतच या क्षेत्रात आपल्याला गुंतवणूकही केली पाहिजे.

 

अपप्रचाराचे खंडण करणार्‍या धर्मप्रेमींच्या पाठीशी
उभे राहिले पाहिजे ! – नंदन मिश्रा, ‘हाय टेक कन्स्ट्रक्शन्स’

नंदन मिश्रा, ‘हाय टेक कन्स्ट्रक्शन्स’

जे लोक सामाजिक प्रसार माध्यमांद्वारे हिंदूंची बाजू मांडतात किंवा हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात वैचारिक खंडन करतात, त्यांना डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून लक्ष्य केले जाते. या समवेतच काही धर्मप्रेमी अपप्रचाराच्या विरोधात ऐतिहासिक सत्य समोर मांडतात. तेव्हा त्यांचे खाते निलंबित केले जाते. अशा धर्मप्रेमींच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून एकमेकांना साहाय्य केले पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन ‘हाय टेक कन्स्ट्रक्शन्स’चे श्री. नंदन मिश्रा यांनी केले.

ते म्हणाले, ‘‘प्रसारमाध्यमांद्वारे हिंदु धर्मावर आघात केल्या जाते. तेव्हा त्या विरोधात वैचारिक मार्गाने लढणार्‍या धर्मप्रेमींना पुरोगामी किंवा डावे विचारक लक्ष्य करतात, तेव्हा प्रसारमाध्यमांवर सक्रीय असलेल्या हिंदूंकडून सहकार्य मिळत नाही. याउलट डावे संघटित असतात. सामाजिक माध्यमांतून विचार मांडतांना शब्दांची निवड विचारपूर्वक केली पाहिजे. आवश्यक त्या ठिकाणी धैर्याने आणि ठामपणे विरोध केला पाहिजे.’’

 

अमरावती येथील आसारामजी बापू संप्रदायचे मानव बुद्धदेव
यांना सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी उपयोग करतांना आलेले अनुभव !

आसारामजी बापू संप्रदायचे मानव बुद्धदेव

१. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी आसाराम बापू यांना रावण म्हटल्याचे खोटे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. संतांची अपकीर्ती करणार्‍या या वृत्तपत्राचा क्रमांक ‘व्हॉटस्अ‍ॅप’द्वारे आसारामजी बापूंच्या अन्य भक्तांना पाठवल्यावर वृत्तपत्राच्या संपादकांना अनेक फोन गेले. आणखी एका वृत्तपत्रानेही असा प्रकार केला. तेव्हाही त्या वृत्तपत्राचा संपर्क क्रमांक भक्तांना पाठवला. परिणामस्वरूप वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर माफीनामा प्रसिद्ध करावा लागला.

२. एकदा एका सभेत मागासवर्गीय नेत्याने ‘भगवद्गीता कचर्‍याच्या डब्यात टाका’, असे म्हटले. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘भगवद्गीता टाकायचीच असल्यास आधी तुमच्या कचर्‍याच्या डब्यात म्हणजे मेंदूत टाकायला हवी’, अशा आशयाची एक कविता बनवून ‘यूट्युब’वर पोस्ट केली. त्याला अनेकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

३. निषेधाचे दूरध्वनी करतांना तो संयत मार्गाने करावा. पुराव्यासाठी तक्रार करतांना ‘कॉल रेकॉर्ड’ करा. भ्रमणभाषचा ‘स्क्रीनशॉट’ घ्या. बर्‍याचदा ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर एखादा संदेश आल्यावर हिंदू नीट न वाचताच पुढे पाठवतात.

‘अन्य वृत्तपत्रे खोटी वृत्ते देतात. त्यामुळे मी सनातन प्रभातविना अन्य कोणतेही वृत्तपत्र वाचत नाही’, असे श्री. मानव बुद्धदेव या वेळी म्हणाले.