सनातन संस्थेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेचा निषेध ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना, कोल्हापूर

श्री. राजेश क्षीरसागर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनचे कायदेविषयक सल्लागार, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयने केलेल्या अटकेचा आम्ही निषेध करतो. सनातन संस्था ही हिंदु धर्माचा प्रसार करणारी आध्यात्मिक संस्था आहे. ती चांगली संस्था आहे. तिचे कार्य मी जवळून पाहिले आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अशा प्रकारच्या हत्या घडत असतात; मात्र त्या उघडकीस येत नाहीत.

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे अथवा कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्या या प्रकारांतच मोडतात. त्यामुळे ‘या सूत्रावर आधारित सीबीआयने आपली तपासाची दिशा ठरवावी’, असे आम्हाला वाटते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात