घरगुती औषधांच्या संदर्भातील माहिती कळवा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना विनंती !

‘पूर्वीच्या काळी घरोघरी ‘आजीबाईचा बटवा’ असे. यामुळे लहानसहान रोगांवरील उपचारांसाठी आधुनिक वैद्यांची (डॉक्टरांची) आवश्यकता भासत नसे. सध्याच्या काळात बहुतेक लोकांना घरगुती औषधांविषयी माहिती नसल्याने ‘जरा काही झाले की, आधुनिक वैद्यांकडे जा’, अशी स्थिती आहे. भावी भीषण आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांना घरगुती औषधांची माहिती व्हावी, यासाठी सनातन संस्था प्रयत्नशील आहे.

ज्या साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना ‘आपल्या परिसरातील वनस्पती अन् घरातील मसाले आदी पदार्थांचा घरगुती औषध स्वरूपात कसा वापर करावा ?’, हे ठाऊक असेल, त्यांनी ती माहिती लिहून किंवा टंकलिखित करून सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे पुढील पत्त्यावर पाठवावी. घरगुती औषधांच्या संदर्भातील माहिती देणारे ग्रंथ किंवा लिखाण उपलब्ध असल्यास तेही पाठवू शकता. साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांचे परिचित वा नातेवाईक यांना या संदर्भात काही माहिती असल्यास तीही पाठवावी.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात