(म्हणे) ‘सनातन संस्थेच्या सूत्रधारांना पकडा !’ – श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

सनातनविषयी काहीही माहीत नसतांना तोंड आहे म्हणून वाटेल ते बरळणारे श्रीपाल सबनीस !

सनातन संस्था ही घटनाविरोधी संस्था असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. संजीव पुनाळेकर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे अधिवक्ता आहेत. (सबनीस यांचा जावईशोध ! – संपादक) त्यांनी आरोपींना सोडवण्याच्या निमित्ताने अनेक प्रकारे गुन्हे दाबण्याच्या दृष्टीने कायद्याचा गैरवापर केला आहे. सीबीआयने त्यांच्यावर जे आरोप केले आहेत, त्यात तत्थ्यांश असला पाहिजे. याच पुनाळेकर यांनी मला ‘तुम्ही मॉर्निंग वॉकला जात जा’, अशी धमकी दिली. या हत्यांमध्ये त्यांचा कळत-नकळत किंवा कायद्याच्या ज्ञानच्या बाजूने थेट संबंध आहे, हा माझा जाहीर आरोप आहे. माझ्या खुनाचा कटही सनातनच्या इमारतीत रचला गेला असला पाहिजे, अशी तक्रार मी पोलिसांकडे केली होती; परंतु पोलिसांनी हे गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांनी निर्लज्जपणे माझ्या तक्रारीचे नकारात्मक उत्तर दिले आणि तक्राराची अदखलपात्र म्हणून नोंद केली. हा माणूस अत्यंत नालायक आहे. (यावरून समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी झटणार्‍या एका अधिवक्त्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरणार्‍या सबनीस यांची मानसिकता स्पष्ट होते ! – संपादक) वकिली व्यवसायाला कलंक आहे. (‘काडीचीही पात्रता नसतांना अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्षपद उबवून वर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काहीही न करणारे सबनीस हेच मराठी माणसाला कलंक आहेत’, असेच मराठी लोकांना वाटते ? – संपादक) या माणसाची शहानिशा करून सनातन संस्थेच्या मूळ सूत्रधारापर्यंत, त्याच्या गाभ्यापर्यंत पोलीस पोचणे, हे देशाच्या दृष्टीने आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात