।। आज योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा शताब्दी जन्मोत्सव ।।

आज योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या शताब्दी जन्मोत्सवानिमित्त (१०० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त) शेवगाव (नगर) येथे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा !

ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥

(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शेवगाव (नगर) – योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त १८ मे या दिवशी येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य गौरव पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. मान्यवर आणि विविध संस्था यांच्या वतीने योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे अभिष्टचिंतन करण्यात येईल. या सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन ‘गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा संस्था, शेवगाव, नगर’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सोहळ्यासाठी उपस्थित रहाणारे प्रमुख मान्यवर !

या सोहळ्यास ह.भ.प. दयानंदजी महाराज, श्री. एस्.व्ही. कुलकर्णी सर, श्री. अंबादास गर्कळ, मुंबई येथील श्री. अरविंदकाका कुलकर्णी, माजी आमदार श्री. नरेंद्र घुले, श्री. अंकुश पालवे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

आध्यात्मिक पुरस्काराचे मानकरी !

१. सनातन संस्थेचे साधक श्री. अतुल पवार

२. ‘गजानन आशिष’ या मासिकाचे संपादक श्री. मनोहर फडणीस

सामाजिक पुरस्काराचे मानकरी !

१. वर्धा येथील मंगेशीताई मून

२. बीड येथील पदव्युत्तर विभागाचे समन्वयक डॉ. महेंद्र गौशाल

आजच्या सोहळ्याचे स्थळ आणि वेळ

स्थळ : प.पू. दादाजी वैशंपायननगर, दूध शीतकरण केंद्राच्या मागे, पाथर्डी रोड, शेवगाव, नगर.

वेळ : दुपारी ३.३० वाजता