परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना उरलेले अवतारी कार्य पूर्ण करण्यासाठी अजून जन्म घ्यावे लागणार असण्यामागील अध्यात्मशास्त्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य, ‘प्रारब्धानुसार पुनर्जन्म होणे, साधना आणि उर्वरित धर्मकार्य करण्यासाठी पुनर्जन्म होणे अन् अवतारी कार्य करण्यासाठी पुनर्जन्म होणे’ यासंदर्भातील शास्त्र, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ५०० वर्षांनंतर होणार्‍या पुढील जन्माची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांसंदर्भात सनातनच्या साधिका कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.

 

१. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या अवतारी कार्याची व्याप्ती आणि पूर्ती

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या अवतारी कार्याची व्याप्ती पुष्कळ आहे. ईश्‍वरी नियोजनाप्रमाणे त्यांच्याकडून या जन्मी ७० टक्के आणि पुढील जन्मी उर्वरित ३० टक्के अवतारी कार्य होणार आहे. अवतारी कार्याची पूर्ती काळानुसार आणि समष्टीचे कल्याण यांच्या आवश्यकतेनुसार ईश्‍वरेच्छेने होणार आहे. त्यामुळे ही दैवी योजनाच आहे.

१ अ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याकडून अवतारी कार्याच्या अंतर्गत या जन्मी
आणि पुढील काही जन्मी होणार्‍या सेवांचे महत्त्व आणि दोन जन्मांत होणार्‍या अवतारी कार्याची पूर्ती

कु. मधुरा भोसले

टीप १ : सनातनची ग्रंथसंपदा इतकी विपुल आहे की, एका जन्मात सर्व ग्रंथांचे लिखाण पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर आठवले पुढील जन्मी उर्वरित ग्रंथांचे लिखाण पूर्ण करणार आहेत. त्यामुळे ऋषीलोकातील ऋषिमुनी त्यांना आदराने ‘कलियुगातील व्यास’ आणि समस्त देवदेवता त्यांना ‘ज्ञानगुरु’, असे संबोधणार आहेत.

टीप २ : मोक्षप्राप्ती करण्यासाठी स्थुलातून गुरु असणे आणि गुरुरूपी ईश्‍वराच्या देहधारी सगुण रूपाचे मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक असते. गुरुकृपेमुळे सूक्ष्म अहंचे समूळ निर्मूलन होऊन जीवात्म्याचे रूपांतर शिवात्म्यात होऊन तो मोक्षपदाला जातो. ज्यांना मोक्ष मिळाला आहे, असे ‘मोक्षगुरु’च सर्व शिष्यांना मोक्षापर्यंत नेतात. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या दुसर्‍या जन्मात साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांना मोक्षप्राप्ती करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे समस्त ऋषिमुनी आणि देवदेवता त्यांना ‘मोक्षगुरु’, असे संबोधणार आहेत.

टीप ३ : वर्ष २०२३ पर्यंत १ ते ७ क्रमांकांच्या पाताळापर्यंतच्या ७० टक्के वाईट शक्तींचा नाश होऊन पृथ्वीवर स्थुलातून ‘हिंदु राष्ट्राची’ स्थापना होणार आहे. हिंदु राष्ट्र आल्यानंतर काही काळाने, म्हणजे सुमारे ५०० वर्षांनंतर पाताळातील सुप्तावस्थेत असणार्‍या ३० टक्के वाईट शक्ती पुन्हा डोके वर काढणार आहेत. त्यामुळे पुन्हा वाईट शक्तींचा उपद्रव चालू होणार. परात्पर गुरु डॉक्टर आठवले त्यांच्या पुढील जन्मात उर्वरित ३० टक्के वाईट शक्तींशी लढून त्यांचा समूळ नाश करणार आहेत. त्यामुळे समस्त देवदेवता आणि ऋषिमुनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना ‘तारणहार’ या विशेषणाने अलंकृत करणार आहेत.

टीप ४ : पृथ्वीवर येणारे हिंदु राष्ट्र १००० वर्षे चालणार आहे. आताचा काळ कलियुग असल्यामुळे सुमारे ५०० वर्षांनंतर येणार्‍या कालचक्राच्या विपरित परिणामामुळे मायेचा प्रभाव वाढून स्थापन झालेले हिंदु राष्ट्र मध्येच विसर्जित होण्याचा धोका संभवणार आहे. हिंदु राष्ट्राची घडी व्यवस्थित बसवून ते १००० वर्षे चालू ठेवण्याचे सामर्थ्य केवळ श्रीविष्णूच्या अवतारामध्ये आहे. त्यामुळे हे कार्य पूर्ण करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना आणखीन एक जन्म घ्यावा लागेल. त्यामुळे समस्त देवदेवता आणि ऋषिमुनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना चालू जन्मात ‘हिंदु राष्ट्र संस्थापक’ आणि पुढील जन्मात ‘हिंदु राष्ट्र संचालक’, या उपाधींनी विभूषित करणार आहेत.

टीप ५ : अवतारी कार्यांतर्गत विविध कलांच्या माध्यमांतून साधना करणार्‍या कलाकार जिवांना मार्गदर्शन करून मोक्षाला नेणे, ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना ज्ञानप्राप्तीची पुढील दिशा देणे, अध्यात्म विश्‍वविद्यालयाची घडी बसवून धर्मप्रसार करणे, यांसारख्या अनेक सेवा अवतारी कार्यांतर्गत असणार आहेत. परात्पर गुरु डॉक्टर आठवले त्यांच्या पुढील जन्मात या विविध कार्यांची पूर्ती करणार आहेत. त्यांचे व्यक्तीमत्त्व बहुगुणी आहे आणि त्यांच्यामुळे कलियुगांतर्गत १००० वर्षांचे छोटेसे सत्ययुग येणार आहे. त्यामुळे समस्त देवदेवता आणि ऋषिमुनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना चालू जन्मात ‘युगपुरुष’ आणि पुढील जन्मात ‘युगप्रवर्तक’, असे संबोधणार आहेत.

 

२. प्रारब्धानुसार पुनर्जन्म होेणे, साधना आणि उर्वरित धर्मकार्य
करण्यासाठी पुनर्जन्म होेणे अन् अवतारी कार्य करण्यासाठी पुनर्जन्म होेणे

टीप १ : पृथ्वीवर जन्म घेऊन साधना केल्याने आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते. त्यामुळे अनेक जीव उरलेले धर्मकार्य आणि साधना पूर्ण करण्यासाठी उच्च स्वर्गलोक, धर्मलोक आणि महर्लोक अशा विविध लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतात.

टीप २ : ज्यांच्यामध्ये देवत्व आलेले असते, असे उन्नत जीव अवतारी कार्यात सहभागी झाल्यामुळे अवतारी कार्य वेगाने पूर्ण होते. त्यामुळे संत, गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्यातील काही जण अवतारी कार्यात सहभागी होण्यासाठी ईश्‍वरेच्छेने पुन्हा जन्म घेणार आहेत.

टीप ३ : भोगयोनी : यांचा जन्म केवळ भोग भोगण्यासाठी होतो. ते त्यांच्या क्रियमाण कर्माचाही वापर धर्माचरण आणि साधना करण्यासाठी करत नसून केवळ मायेत रममाण होण्यासाठी करतात. त्यामुळे त्यांचा देवाण-घेवाण हिशोब आणि प्रारब्ध न्यून न होता आणखीन वाढतात. त्यांना स्वतःच्या कर्मानुसार सुख-दुःखे भोगावी लागतात. त्यामुळे त्यांच्या योनीला ‘भोेगयोनी’ म्हटले आहे.

टीप ४ : योगयोनी : चांगले साधक आणि शिष्य धर्माचरण आणि साधना करून स्वतःला ईश्‍वराशी जोडतात. ते स्वतःच्या क्रियमाण कर्माचा योग्य वापर करतात. त्यामुळे कालांतराने त्यांचे प्रारब्ध आणि देवाण-घेवाण हिशोब न्यून होऊन संपतो. त्यामुळे त्यांच्या योनीला ‘योगयोनी’ म्हटले आहे.

टीप ५ : अवतारी पुरुष : हे जन्मतःच मुक्त असतात. त्यामुळे ते जन्म-मृत्यू, देवाण-घेवाण हिशोब आणि प्रारब्ध अन् क्रियमाण कर्म या सर्वांपासून मुक्त असतात. त्यांच्यामध्ये अहंचा लवलेशही नसतो. त्यामुळे त्यांचे कर्म ‘अकर्म कर्म’ होते. ते अवतारी कार्य करून समष्टीचा उद्धार करण्यासाठी पुनर्जन्म घेतात. सनातनचे संत, गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले या गटांत आहेत.

 

३. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या
५०० वर्षांनंतर होणार्‍या पुढील जन्माची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

अ. हा जन्म सुमारे ५०० वर्षांनंतर होणार आहे. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर आठवले त्यांचे उर्वरित अवतारी कार्य पूर्ण करणार आहेत. ५.५.२०१७ या दिवशी मंगळूरूमध्ये जन्माला आलेले पू. भार्गवराम यांच्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या अवतारीपणाची प्रचीती त्यांच्या बालपणापासूनच येणार आहे.

अ १. या संदर्भात सनातनचे साधक श्री. दिनेश शिंदे यांनी सांगितले की, वर्ष १९९४ मध्ये एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले काही साधकांसमवेत असतांना त्यांना म्हणाले, ‘‘आपण पुन्हा ५०० वर्षांनी पृथ्वीवर जन्माला येणार आहोत.’’

अ २. त्याचप्रमाणे नाडीपट्टीच्या वाचनातही ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ५०० वर्षांनंतर पुनर्जन्म होणार आहे’, असे सांगण्यात आले होते.

आ. सनातनचे काही दिवंगत आणि हयात असणारे साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु हे परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या पुढील जन्माच्या वेळी, म्हणजे सुमारे ५०० वर्षांनंतर पुनर्जन्म घेऊन परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या अवतारी कार्यात सहभागी होणार आहेत.

इ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या पुढील जन्मी त्यांना या जन्माप्रमाणे तीव्र स्वरूपाचे शारीरिक भोग भोगावे लागणार नाहीत.

ई. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा पुढील अवतार ‘ज्ञानावतार’, ‘पूर्णपुरुषोत्तम’ आणि ‘युगप्रवर्तक’ म्हणून विख्यात होईल.

उ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे अवतारीपण आणि दैवी गुण यांची अनुभूती अन् प्रचीती त्यांच्या अवतारी लीलांमधून येणार आहे. त्यामुळे त्यांना ‘लीलाधारी विष्णुस्वरूप पूर्णपुरुषोत्तम’ म्हणून ओळखले जाईल.

कृतज्ञता !

‘हे भगवंता, तू आम्हाला परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या आगामी अवताराबद्दल ज्ञान देऊन कृतार्थ केलेस’, यासाठी मी तुझ्या सुकोमल चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०१८, रात्री ११.५०)