सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे दिंडी

दिंडीत सहभागी हिंदुत्वनिष्ठ, सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली दिंडी अत्यंत चैतन्यमय वातावरणात पार पडली. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री भवानीमाता यांची प्रतिमा असलेल्या २ पालख्या, परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मेघडंबरीमधील प्रतिमा, पारंपरिक वेशातील रणरागिणी आणि कार्यकर्ते, क्रांतीकारकांच्या वेशातील बालसाधक, लेझीम पथक, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आणि जोडीला ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या घोषणा यांमुळे अवघे वातावरण चैतन्यमय आणि भगवे झाल्याचे पहायला मिळाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात