‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आरोग्य चांगले रहावे आणि ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी’, यांसाठी चेन्नईतील जीवनाडीपट्टीच्या वाचनातून भृगु महर्षींनी सांगितलेले काही परिहार अन् सनातन संस्थेला दिलेला आशीर्वाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘२.५.२०१९ या दिवशी चेन्नई येथील भृगु जीवनाडीपट्टीचे वाचक श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या निवासस्थानी वर्ष २०१९ मधील चैत्र मासातील विहारी संवत्सरामधील पहिले नाडीवाचन झाले. श्री. सेल्वम्गुरुजी यांनी दुपारी १.४० ते दुपारी ३.१० या वेळेत भृगु जीवनाडीपट्टीतील ८ व्या नाडीपट्टीचे वाचन केले. या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्री. विनायक शानभाग उपस्थित होते. या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी महर्षींना काही प्रश्‍न विचारले आणि त्यांची उत्तरे देण्यासाठी प्रार्थना केली.

डावीकडून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

१. नाडीवाचनाच्या आरंभी भृगु महर्षींनी सांगितलेले नाडीवाचन करण्यामागील कारण

नाडीवाचन करतांना श्री. सेल्वम्गुरुजी

‘ॐ भृगु महर्षींच्या कृपेने या विहारी संवत्सरातील चैत्र मासात तुम्ही (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) जीवनाडी वाचन ऐकायला आला आहात. नाडीवाचनाच्या आरंभी भृगु महर्षि भगवान शिवाच्या चरणी नमस्कार करून म्हणतात, ‘आजचे नाडीवाचन सनातन संस्थेच्या प्रश्‍नांची उत्तरे आणि त्यांना विशेष आशीर्वाद देणे, यांसाठीच आहे. सनातन संस्थेवर श्रीमहाविष्णु आणि त्याची शक्ती श्री महालक्ष्मी यांची विशेष कृपा आहे. आपल्या सर्व शत्रूंवर विजय प्राप्त करणार्‍या ‘जयंत’ नावाच्या गुरूंसाठी (परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यासाठी) हे नाडीवाचन होत आहे. सध्या ते मोक्षस्थानावर आहेत. स्वतःसाठी काहीही न करता ते संपूर्ण जगतासाठी झटत आहेत. ‘स्वतःला मिळालेले ज्ञान सर्वांना मिळावे’, या तळमळीपोटी तेे दिवसरात्र कष्ट घेत आहेत.

गेल्या एक वर्षात भृगु महर्षींनी सांगितलेले सर्व परिहार परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परिपूर्ण केले आहेत. यासाठी तीनही गुरूंना भृगु महर्षींचा विशेष आशीर्वाद आहे.

 

२. धर्माचे कार्य करत असतांना यापुढे येणार्‍या अडथळ्यांचे स्वरूप !

मकर राशीत जन्म घेतलेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आताच्या ग्रहस्थितीनुसार त्यांना सनातन धर्माच्या संस्थापनेसाठी महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. धर्माचे कार्य करत असतांना यापुढेही छोटे छोटे अडथळे येत रहाणारच आहेत. गुरूंच्या ग्रहस्थितीनुसार भूमीशी संबंधित असेही काही अडथळे येेणार आहेत. सनातन संस्थेशी निगडित असलेले काही जण आणि सनातन संस्थेचे ‘हितचिंतक’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या काही व्यक्ती साधकांमध्ये विकल्प निर्माण करतील. काही असंतुष्ट साधकांच्या माध्यमातून साधकांमध्ये वैमनस्य निर्माण करतील. कालांतराने हे सर्व अडथळे दूर होणार आहेत.

 

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्याशी संबंधित
अडथळे दूर होण्यासाठी भृगु महर्षींनी सांगितलेले परिहार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्याशी संबंधित अडथळे सिद्ध आणि ॠषि-मुनी दूर करणार आहेत. हे अडथळे दूर होण्यासाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील खालील ठिकाणी जाऊन देवाचे दर्शन घेऊन प्रार्थना करावी.

३ अ. परिहार १

तिरुपईंजिली (जिल्हा तिरुचिरापल्ली) तमिळनाडू येथे जाऊन सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणे

या ठिकाणी शिवाने कालसंहारक अशा यमाला झालेल्या अहंकाराची शिक्षा देण्यासाठी त्याचा वध केला आणि नंतर भूदेवीच्या सांगण्यावरून यमराजाला पुर्नजन्म दिला. या ठिकाणी जाऊन सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. मे मासात हा परिहार पूर्ण करावा.

३ आ. परिहार २

तिरूमळैपाडी (जिल्हा अरियलूर), तमिळनाडू येथील ‘वैद्यनाथ स्वामी’ मंदिरात जाऊन नंदी आणि शिव यांना प्रार्थना करणे

या ठिकाणी इंद्राने आणि अनेक सिद्धांनी शिवाला प्रार्थना करत तपश्‍चर्या केली आहे. या ठिकाणी ‘शिवाचे वाहन असलेल्या नंदीचा विवाह झाला’, असे म्हटले जाते. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी येथील ‘वैद्यनाथ स्वामी’ मंदिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी नंदी आणि शिव यांना प्रार्थना करावी. मे मासात हा परिहार पूर्ण करावा.

३ इ. परिहार ३

रामनाथी आश्रमातील मारुतीची प्रत्येक शनिवारी विशेष पूजा करणे

विहारी संवत्सरामध्ये शनी ग्रह राजास्थानावर आहे. सनातन संस्थेला शनीदेवाचे विशेष आशीर्वाद आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्याशी संबंधित अडथळे दूर होण्यासाठी हनुमंताची पूजा करावी. रामनाथी, गोवा येथील आश्रमात असलेल्या मारुति मंदिरातील मारुतिरायाला प्रत्येक शनिवारी उडदाच्या वड्यांची माळ घालावी, खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि तुळशीची किंवा विड्याच्या पानांची माळ अर्पण करून मूर्तीला थोडा शेंदूर लावावा. हा परिहार शनिवार ४.५.२०१९ ते गुरुपौर्णिमेपर्यंत, म्हणजे शनिवार, १३.७.२०१९ पर्यंत करावा.

३ ई. परिहार ४

सूर्योपासनेसाठी गुरुपौर्णिमेपर्यंत अग्निहोत्र करणे

या आधी महर्षींनी ‘३०.४.२०१९ पर्यंत अग्निहोत्र करावे’, असे सांगितले होते. हे अग्निहोत्र आता गुरुपौर्णिमेपर्यंत चालू ठेवावे. विहारी संवत्सरात सूर्य ग्रह सेनाधिपती स्थानावर आहे आणि सूर्याचा संपूर्ण आशीर्वाद सनातन संस्थेला आहे.

३ उ. परिहार ५

गुरुपौर्णिमेच्या नंतर ‘आदित्य हृदय स्तोत्रा’चे पठण करून सूर्योपासना करणे

गुरुपौर्णिमेपर्यंत अग्निहोत्र चालू ठेवून गुरुपौर्णिमेनंतर प्रत्येक मासाच्या पहिल्या रविवारी सूर्योपासना म्हणून ‘आदित्य हृदय स्तोत्रा’चे पठण करावे. रामनाथी, तसेच इतर मुख्य आश्रमांत सूर्योदयाच्या वेळी काही साधकांनी पूर्व दिशेला तोंड करून बसावे आणि ‘आदित्य हृदय स्तोत्रा’चे एकदा पठण करावे.

या वेळी साधकांनी सूर्यनारायणाला पुढील प्रार्थना करावी, ‘हे सूर्यनारायणा, आम्हा सर्व साधकांचे आत्मबळ वाढव. आमची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा वाढू दे आणि आमचे मन त्यांच्या चरणांवर स्थिर कर. आम्हा सर्व साधकांवर तुझी अखंड कृपा राहू दे.’

(‘वरील प्रार्थनेत आवश्यकतेनुसार पालट करावेत. आता साधकांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर १०० टक्के श्रद्धा वाढणे, हेच महत्त्वाचे आहे.’ – श्री. सेल्वम्गुरुजी)

 

४. आगामी काळात सनातन संस्थेचा संबंध ‘राजा’,
‘राष्ट्र’ आणि ‘देशाचे राजकारण’ यांच्याशी येणार आहे !

वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या नंतर सनातन संस्थेचा संबंध देशाच्या राजाशी येणार आहे. आता काळ असा येणार आहे की, सनातन संस्थेचा संबंध राजा, राष्ट्र आणि राष्ट्राचे राजकारण यांच्याशी येणार आहे. महर्षींच्या दृष्टीने ‘भारत’ म्हणजे आताचा भौगोलिकदृष्ट्या दाखवला जाणारा भारत नसून ‘संपूर्ण पृथ्वी म्हणजे भारत’ होय. सनातन संस्थेचा आश्रम म्हणजे भारत आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे यांच्याशी निगडित असे महत्त्वाचे स्थान होणार आहे. सनातन संस्थेवर सूर्यनारायणाची महत्कृपा आहे.

 

५. भूमीची खरेदी करण्याविषयी भृगु महर्षींचे मार्गदर्शक बोल !

५ अ. वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेनंतर सनातन संस्थेचे
भूमीबळ वाढणार असल्याने तेव्हा भूमीशी संबंधित मोठे निर्णय घ्यावेत !

आताचा काळ असा आहे की, सनातन संस्थेला अनेक वास्तूंची निर्मिती करावी लागणार आहे आणि त्यासाठी भूमी खरेदी करणे आवश्यक आहे. वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेपर्यंत सनातन संस्थेला ग्रहस्थितीनुसार भूमीबळ अल्प आहे. तोपर्यंत ‘भूमीविषयी बोलणी करतांना साधकांकडून काही चुका होऊ नयेत’, याची काळजी घ्यावी. यामध्ये अडथळे येऊ शकतात, तसेच भूमीसंदर्भातील बोलणी करतांना विक्रीची किंमत काही वेळा अल्प-अधिकही होऊ शकते. वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेनंतर भूमीबळ वाढणार असल्याने तेव्हा भूमीशी संबंधित मोठे निर्णय घ्यावेत. सध्या मोठे निर्णय घेणे टाळावेत. वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेनंतर साधकांकडून दान रूपात भूमी प्राप्त होण्याची शक्यता अधिक आहे. दानकर्ते स्वतःहून आपल्याकडे येतील !

५ आ. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’साठी देवीच्या
मंदिराशी निगडित भूमी मिळणार असून कमलांबिका देवीची विशेष कृपा
असल्याने सनातन संस्थेच्या वास्तू निर्मितीच्या कार्याचा विस्तार होणारच आहे !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी मिळणारी मोठी भूमी एखाद्या देवीच्या मंदिराशी निगडित किंंवा आध्यात्मिक परंपरेशी संबंधित भूमी आहे. या भूमीशी संबंधित असलेली व्यक्ती देवीच्या मंदिराशी निगडित आहे. कमलांबिका देवीची विशेष कृपा असल्याने सनातन संस्थेच्या वास्तू निर्मितीच्या कार्याचा विस्तार होणारच आहे. भूमी शोधण्याची सेवा, तसेच त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व सेवा सध्या चालूच ठेवाव्यात. गुरुपौर्णिमेच्या नंतर हे कार्य वेगाने होणार आहे.

 

६. साधक आणि सनातन संस्थेचे कार्य यांविषयी भृगु महर्षींचे आश्‍वासक उद्गार !

अ. आता अनेक साधकांना सिद्ध करून त्यांना पृथ्वीवर सर्व दिशांना ‘हरि धर्मप्रसार’ कार्यासाठी पाठवायचे आहे.

आ. धर्मकार्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या सनातनच्या साधकांचे आध्यात्मिक कष्ट आता टप्प्याटप्प्याने न्यून होत आहेत. सनातनच्या सर्व साधकांसमवेत महाकालीदेवी कवच रूपाने सतत असते. साधक आणि सनातन संस्था यांच्यावर असलेले मोठे संकट आता दूर झाले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गेल्या वर्षभरात भुवनेश्‍वरी देवीची अखंड उपासना केल्याने हे साध्य झाले आहे.

इ. ‘सनातन संस्था’ म्हणजे श्रीविष्णूचे पृथ्वीवरील चिन्ह आहे. लोककल्याण करणे आणि सर्वांना आनंद देणे, यांसाठी सनातन संस्था अन् सनातन आश्रम यांची स्थापना झाली आहे. पृथ्वीवर ‘सात्त्विक राष्ट्र’ (ईश्‍वरी राज्य) आणण्यासाठी सर्व प्रकारचे विरोध डावलून सनातन संस्था उभी रहाणार आहे. रामनाथी आश्रमात केलेली ‘कमलपिठाची स्थापना’ हे ‘पृथ्वीवर ‘सात्त्विक राष्ट्रा’ची स्थापना’ होण्याचेच प्रतीक आहे.

ई. ‘सत्य म्हणजे सनातन संस्था’ आणि ‘सनातन संस्था म्हणजे सत्य’, असे असल्याने सनातन संस्थेला त्रिमूर्तींचा (गुरु दत्तात्रेयांचा) आणि सर्व महर्षींचाही आशीर्वाद आहे.

उ. मनुष्य ‘गुरु-शिष्य’ या नात्याचे महत्त्व विसरला आहे. त्याला ‘हे महत्त्व कळावे’, तसेच ‘गुरूंच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती कशी करून घ्यावी ?’ हे कळावे, यासाठी पृथ्वीवर सनातन संस्थेची स्थापना झाली आहे. गुरूंच्या चरणी शरण गेल्याने सर्वकाही साध्य होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘सनातन संस्था’ होय !

 

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी

अ. मनुष्य रूपात असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना थकवा असला, तरी वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे त्यांच्यावर मृत्यूयोगासारखी स्थिती ओढवणार नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा श्‍वास म्हणजे महाकालीदेवी आहे. असे असल्याने आता त्यांच्यावर मृत्यूसारखे संकट येणार नाही. आता त्यांनी अधिकाधिक वेळ ईश्‍वर चिंतनात रहावे. त्यांच्या केवळ अस्तित्वानेच कार्य होणार आहे. तेे केवळ त्यांच्या ज्ञानबळाने काळाप्रमाणे आवश्यक असे कार्य करत आहेत.

आ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना आता अन्य कोणतीच नाती राहिली नसून शेवटपर्यंत त्यांच्यासाठी ‘गुरु-शिष्य’ हेच नाते असणार आहे.

इ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि महर्षि यांच्या कृपेने आज सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ भृगु महर्षींकडे नाडीवाचनाला आल्या. आज देवाने प्रलय काळात घेतलेल्या मत्स्यवताराशी संबंधित ‘मत्स्य जयंती’ आहे आणि आज नंदीशी संबंधित प्रदोष काळ आहे. यामुळेच आज सनातन संस्थेवर आलेली दोन मोठी संकटे दूर झाली आहेत.

ई. येणार्‍या काळात स्त्रियांमुळे येणारे संकट आधीच ओळखून परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी २ स्त्रियांनाच सनातन संस्थेच्या कार्याचे दायित्व दिले आहे. त्यांनी दोन्ही माताजींना (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना) त्यांचे ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ नेमण्यामागे मोठा कार्यकारणभाव दडलेला आहे. तो काळानुसार साधकांच्या लक्षात येईल.

 

८. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी

८ अ. भृगु महर्षींचा विशेष आशीर्वाद

आतापर्यंत भृगु महर्षींनी सांगितलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांचे प्रवास, देवदर्शन, तसेच परिहार सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परिपूर्णरीत्या पूर्ण केलेे आहेत. यासाठी त्यांना भृगु महर्षींचा विशेष आशीर्वाद आहे.

८ आ. भृगु महर्षींनी ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची
कैलास-मानस यात्रा कोणत्याही अडथळ्याविना पार पडेल’, असे सांगणे

वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या आधी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना उत्तर भारतातील तीर्थक्षेत्रांचे दर्शन आणि कैलास-मानस सरोवराचे दर्शन होणार आहे. कैलास-मानस सरोवर यात्रेमध्ये त्यांना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि स्वतः शिववाहन नंदीदेव त्यांच्यासमवेत राहून त्यांना वाट दाखवणार आहे.

८ इ. कर्नाटक आणि केरळ या राज्यांत त्रास होण्याची शक्यता असल्याने तिकडचा प्रवास वर्ज्य करावा !

भृगु महर्षि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना उद्देशून म्हणतात, ‘अगं मुली, सध्या तुला कर्नाटक आणि केरळ या प्रदेशांत प्रवास करणे वर्ज्य आहे. तेथे शस्त्रधारी माणसे आणि अथर्ववेद विद्या शिकलेले यांच्याकडून तुला धोका आहे. अथर्ववेद विद्या शिकलेल्यांकडून तुझ्यावर सतत सूक्ष्मातून आक्रमणे होत आहेत. ते तुझ्या नावाला काळिमा फासण्यासाठी प्रयत्न करतील. नोव्हेंबर २०१९ पर्यंत कर्नाटक आणि केरळ या प्रदेशात जाऊन भेटीगाठी करणे टाळावे. प्रवासाच्या वाटेत ती राज्ये येत असतील, तर प्रवास करण्यात अडचण नाही.

८ ई. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कार्तिकस्वामींची उपासना करावी !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना गुरु ग्रहाचा संपूर्ण आशीर्वाद आहे. सध्या त्यांनी कार्तिकेयाची उपासना करावी आणि कार्तिकस्वामींना अधिकाधिक प्रार्थना करावी. इंद्रसेनापती कार्तिकेयाने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याभोवती सुरक्षा-कवच निर्माण केले आहे. त्यांच्या दैवी प्रवासाला सर्व देवता, ॠषि-मुनी आणि विशेष करून कार्तिकस्वामींची अनुमती आहे. नोव्हेंबर २०१९ पर्यंत कर्नाटक आणि केरळ सोडून इतर सर्व प्रांतांमध्ये जाण्यास अडचण नाही.

८ उ. महालक्ष्मीस्वरूप सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ म्हणजे स्वयं अष्टधा
प्रकृती असल्यामुळे प्रकृतीशी संबंधित सर्व गोष्टी त्यांच्याकडे आकर्षित होत असणे

महालक्ष्मीस्वरूप सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ म्हणजे स्वयं अष्टधा प्रकृती आहे. अष्टधा प्रकृती असल्याने प्रकृतीशी संबंधित सर्व जण त्यांच्याकडे आकर्षित होतात. माणसे, वस्तू, धन आणि सर्व प्रकारची संपदा त्यांच्याकडे आकर्षित होते. त्यामुळे त्या कुठेही गेल्या, तरी तेथील अनोळखी माणसे त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांना सुब्रह्मण्यम् देवाचा अखंड आशीर्वाद आहे. महालक्ष्मी भूमी तत्त्वाशी संबंधित असल्याने भूमीशी संबंधित सर्व काही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ त्यांच्याकडे आकर्षित होते. त्या ज्या ठिकाणी जातात, तेथे त्यांच्याशी निष्ठा असलेल्या माणसांचे कडेच निर्माण होते. ‘गुरूंनी सांगितलेला उपदेश त्या माणसांपर्यंत पोचवणे’, एवढेच त्यांच्या मनात असते. गुरूंच्या कृपेने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पृथ्वीवर सगळीकडे जाण्याची शक्ती मिळाली आहे.

 

९. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी

अ. गुरूंच्या कृपेने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना गुरूंचे कार्य, तसेच सर्व आश्रमांची सेवा पहाण्याची शक्ती मिळाली आहे. शेवटपर्यंत त्या गुरूंच्या धर्मप्रसार कार्याचे दायित्व सांभाळतील.

आ. कार्तिक मासात, म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये कार्याविषयी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तोपर्यंत गुरूंचे कार्य वाढवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत. साधकांना सिद्ध करणे आणि त्यांची श्रद्धा वाढवणे, यांसाठी प्रयत्न करावेत. डिसेंबर २०१९ पर्यंत साधक असे घडल्यावर पुढील कार्य आपोआप चालू राहील.

इ. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या भूमीशी निगडित सेवा करत असतांना छोटे छोटे अडथळे येतील; पण या सर्व अडथळ्यांवर मात करून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून श्रीमहाविष्णु हे कार्य करवून घेणार आहे.

 

महान गुरुपरंपरेला आणि सनातन संस्थेला दिलेला आशीर्वाद !

अ. सनातन संस्थेला भृगु महर्षिं आणि ब्रह्मदेव यांचा विशेष आशीर्वाद आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्था पृथ्वीचे ब्रह्मलिखित पालटणार आहे. हे दैवी नियोजन आहे.

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले परम आचार्यांप्रमाणे ‘श्रेष्ठ गुरु’ या रूपाने संपूर्ण पृथ्वीवर विराजमान झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेली ही नवीन गुरुपरंपरा एका नवीन इतिहासाची नांदी आहे. श्रीविष्णूने ‘जयंत’ या रूपात अवतार धारण करून त्याच्या माध्यमातून श्रेष्ठ अशा गुरुपरंपरेचा आरंभ केला आहे. ही गुरुपरंपरा पुढील अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीवर चालू रहाणार आहे.

इ. विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुरूपात स्वयं अवतार धारण करून १९.२.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित केले. अशा प्रकारे त्यांनी पृथ्वीवर एका महान गुरुपरंपरेला आरंभ केला. गुरूंच्या या महान गुरुपरंपरेला सर्व सिद्ध, ॠषिमुनी यांचा संपूर्ण आशीर्वाद आहे.

आजचे नाडीवाचन दुपारी ३.१० ला पूर्ण झाले.’

संकलक : श्री. विनायक शानभाग, चेन्नई (२.५.२०१९)

 

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भृगु महर्षींना विचारलेले प्रश्‍न

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी चेन्नई येथील भृगु जीवनाडीपट्टीचे वाचक श्री. सेल्वम्गुरुजी यांना पुढील प्रश्‍न विचारले.

१. एका संतांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रकृतीविषयी आम्हाला सांगितले आहे, ‘परात्पर गुरु डॉक्टरांची प्रकृती पुष्कळ खालावली आहे. त्यांची शारीरिक स्थिती चांगली नाही आणि ऑगस्ट २०१९ पर्यंत ही स्थिती अशीच रहाणार आहे.’ परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रकृतीसाठी काय करावे ?

२. त्या संतांनी हेही सांगितले आहे, ‘सध्या भूमीचे व्यवहार करू नका. कोणाला आगाऊ रक्कम दिली असेल आणि तो व्यवहार चालू असेल, तरच आश्रमाजवळची एखादी भूमी निश्‍चित करू शकता.’ ‘भूमीविषयी महर्षींनी आम्हाला मार्गदर्शन करावे’, अशी प्रार्थना करते.

३. त्या संतांनी माझ्याविषयी सांगितले आहे की, सध्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भारतात आणि विदेशात दौर्‍यावर जाणे थांबवावे. पुढे काही काळानंतर त्यांच्यासाठी जो विदेश दौरा असेल, तो शेवटचाच दौरा असेल ! ‘दौर्‍याविषयी महर्षींनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे’, ही प्रार्थना आहे.

यानंतर श्री. सेल्वमगुरुजी यांनी नाडीपट्टीचे वाचन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात