सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात धर्मांधाकडून मोठ्या प्रमाणात जिहाद करण्याच्या धमकीचे पत्र

सनातनच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

  • धर्मांधांच्या अशा धमक्यांविषयी मुसलमानधार्जिणे पुरो(अधो)गामी, तथाकथित विचारवंत, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आणि शासनकर्ते काही बोलतील का ? 
  • हिंदूंनो, धर्मांधांकडून जिहाद करण्याच्या दिल्या जाणार्‍या धमक्या जाणा आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी वेळीच संघटित होऊन अन् धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

पनवेल – देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात २४ एप्रिल या दिवशी धर्मांधाकडून ऊर्दूमिश्रित हिंदी भाषेतील धमकीचे निनावी पत्र टपालाने आले आहे. या पत्रामध्ये धर्मांध मोठ्या प्रमाणावर जिहाद करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता लागू असतांना असे पत्र मिळणे हे पुष्कळ गंभीर स्वरूपाचे आहे.

या पत्राच्या आरंभी ‘बिसमिल्लाहिर्रहमानिर्रहीम’ आणि ‘असलाम वालेकुम’ आणि पत्राच्या शेवटी ‘इस्लाम जिंदाबाद’, ‘कौमी एकता जिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’, ‘अल्लाह हाफिज’ असे म्हटले आहे. पत्रावर चांद-तार्‍याची चिन्हे आहेत.

या पत्राविषयी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात सनातनच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. यात म्हटले आहे, ‘या पत्रात सनातन धर्माविषयी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे, तसेच धर्माचे कार्य करणार्‍या संस्थेला धमकावण्यात आले आहे. याद्वारे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तरी हे पत्र कोणत्या पोस्टातून आले आहे याचा, तसेच त्या पोस्टाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही छायाचित्रक (कॅमेरे) पडताळून त्याविषयी शोध घ्यावा. या अज्ञातांविरुद्ध कलम २९५ अ आणि १५३ अ किंवा तत्सम कोणत्याही आवश्यक कलमाप्रमाणे गुन्हा नोंद व्हावा. या पत्राची योग्य ती नोंद घेऊन त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, ही विनंती.’

या पत्रातील काही सूत्रे पुढीप्रमाणे आहेत –

१. आमचा हेतू चांगला असूनही या देशात पूर्वीपासून आम्हाला परके समजले जाते. (हेतू चांगला असता, तर कोणी परके समजण्याचा प्रश्‍नच येत नाही; मात्र ज्यांची पाकवर निष्ठा आहे आणि या देशाचा ‘इस्लामीस्तान’ करायचा आहे, त्यांचा हेतू शुद्ध कसा असेल ? – संपादक) आम्हाला गद्दार म्हटले जाते.

दुनियेचे मुसलमान जाणतात की, हिंदुस्थान काफिरांचा देश आहे. काफीर हिंदू त्यांच्याच देशातील मुसलमानांना पायाखाली तुडवतात. इस्लामच्या वाटेवर असणार्‍या आमच्या जिहादी मुसलमान बांधवांना आतंकवादी म्हणून त्यांना मारले जाते. (आतापर्यंत जिहादी आतंकवाद्यांनी या देशावर केलेली आक्रमणे पहाता आणि काश्मीरसह देशभरातील हिंदूंचा केलेला नरसंहार पहाता कोण कोणाला पायाखाली तुडवत आहे, हे लहान मूलही सांगेल ! – संपादक)

२. येथे रहाणार्‍या बांगलादेशी आणि रोहिंग्या जमातीसमवेत अन्याय केला जातो. (घुसखोरी करून भारतातील सर्व सोयीसुविधा लाटणारे आणि भारतियांवरच अन्याय करणारे बांगलादेशी घुसखोर अन् रोहिंग्या आणि त्यांची पाठराखण करणारे धर्मांध कधीतरी या देशात शांती नांदू देतील का ? – संपादक) आमच्या प्रेमाला ‘लव्ह जिहाद’ म्हणून त्याची अपकीर्ती केली जाते. मुसलमानांनी आणि किती सहन करायचे ?

३. खरे मुसलमान केवळ त्यांचा हक्क घेणे नाही, तर ‘बलपूर्वक घेण्या’चे जाणतात. अल्लाने मुसलमानांना फर्मान केले आहे की, आम्ही सर्व मुसलमान बांधवांनी एका ध्येयाने पुढे येऊन एका ध्येयाच्या रस्त्यावर जिहादसाठी सिद्ध झाले पाहिजे.

४. सर्व सामाजिक आणि अन्य प्रसारमाध्यमे यांतून हे पहायला मिळते की, हिंदुस्थातील प्रत्येक भागात मुसलमान त्यांची ताकद वाढवण्याच्या कामी लागले आहेत. देशातील विविध भागांत आम्ही आमचे बस्तान बसवले आहे. (हिंदूंनो, हा धोका जाणा आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी संघटित व्हा आणि स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – संपादक)

५. तुम्ही विसरलात का की, काश्मीरमध्ये आमच्या जिहाद्यांनी तुम्हा काफिरांना बाहेरचा रस्ता कसा दाखवला ते ? आता काफिरांना कधीच तिथे फिरकू दिले जाणार नाही. हे सोडाच; मात्र बांगलादेश आणि पाकिस्तान येथे काफिरांना कशी वागणूक दिली जाते, तुम्हा काफिरांना कळतच असेल. खबरदार काफिरांनो, आता तुमची शामत आली आहे.

६. तुम्हाला संपवण्यासाठी आम्ही मुसलमान बांधव तुमच्यावर कहर बनून तुटून पडणार आहोत. तुमचा जो मजेशीर हिंंदु धर्म आहे, त्याला आमचे मुजाहिदिनी भाई खोखला करून पूर्णपणे संपवण्याच्या मागे लागले आहेत. आम्हाला माहीत आहे की, तुम्हालाही हे माहीत असणार.

७. देहलीपासून हैद्राबादपर्यंत आणि जम्मू काश्मीरपासून आसामपर्यंत, पश्‍चिम बंगालपासून केरळपर्यंत कोट्यवधींनी पसरलेले सच्चे मुसलमान ‘मुसलमान’ होण्याचे कर्तव्य निभावत आहेत. आम्ही सगळे वेगळे दिसत असलो, तरी आम्ही सगळे एक आहोत. हीच आमची ताकद आणि धैर्य आहे. ते कोणी तोडू शकत नाही. तो दिवस दूर नाही, जेव्हा चहुबाजूंनी ‘इस्लाम इस्लाम’ ऐकू येईल.

८. तुमच्या आतंकवाद्यांनी धोक्याने बाबरी मशीद शहीद केली; मात्र अजूनही तुम्ही त्या भूमीवर तुमचे राममंदिर बनवू शकला नाहीत आणि ना कधी बनवू शकाल. ही तुम्हा काफिरांच्या गालावर आमची जोरदार थप्पड आहे. (याविषयी भाजप सरकारला आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)

९. आम्हाला माहीत आहे आमची लढाई मोठी आणि काट्यांनी भरलेली आहे. हा अल्लाचा रस्ता आहे अन् यात हसत हसत कुर्बान झाले, तरी आमची काही तक्रार आणि दुःख नाही. एक सच्चा मुसलमान आपला धर्म आणि समुदाय यांच्यासाठी आपला जीव हातात घेऊन चालतो. (स्वधर्मासाठी मुसलमान त्यांचा जीवही द्यायला सिद्ध असतात; मात्र किती हिंदू हिंदु धर्माच्या रक्षणासाठी असा विचार करतात ? हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा आणि संघटितपणाचा अभाव असल्यामुळेचे ते धर्मांधांकडून वारंवार मार खातात ! – संपादक)

१०. तुम्हा काफिरांच्या स्त्रियांना आमच्या बिछान्यावर घेऊन त्यांना पूर्ण वापरून घेऊ. (हिंदूंनो, स्वत:च्या आई-बहिणींचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हा ! – संपादक)

११. काँग्रेस, बसपा, सपा, तृणमूल काँग्रेस आमचे आहेत. जिहादची पाक नियत पहात सर्वत्र आम्हाला साहाय्य करायला बसले आहेत. तुम्हा काफिरांना माहीत आहे की, तुम्ही आमचे काही बिघडवू शकत नाही. पूर्ण देशातील मुसलमान एक आहेत आणि पूर्ण देशाचे पोलीस आमच्या विरोधात जाऊ शकत नाहीत. (यावरून धर्मांधांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हेच लक्षात येते ! असे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ? – संपादक)

१२. काफिरांनो, लक्षात ठेवा, पूर्ण हिंदुस्थानात आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही आणि आम्ही आमचा खेळ पूर्ण करू. आम्ही मुसलमान तुम्हा काफिरांवर कहर बनून तुटून पडू. आजपासूनच तुमच्या मरणाचे घडे मोजणे चालू करा. तुमच्यासाठी कयामत येणार आहे. (भारतात धर्मांधांचे लांगूलचालन केल्यामुळे ते अशी धमकी देण्याचे धारिष्ट्य करतात ! – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात