शिरढोण (जिल्हा रायगड) येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला खासदार श्रीरंग बारणे यांची भेट

श्री. बारणे (डावीकडे) यांना ग्रंथ देतांना सनातनचे साधक

रायगड – जिल्ह्यातील शिरढोण या गावी हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. त्या वेळी शिवसेनेचे खासदार श्री. श्रीरंग बारणे यांनी शिरढोण ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. अविनाश वाकडीकर आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रमोद कर्णेकर यांच्यासह ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी श्री. श्रीरंग बारणे यांनी ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हा ग्रंथ विकत घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात