निर्भीडपणे सत्य प्रसिद्ध करणार्‍या सनातन संस्थेचे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या साधकांकडून कौतुक !

अमरावती – सनातन पंचांगामध्ये २५ एप्रिल या दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामबापू यांचा अवतरण दिवस प्रसिद्ध करण्यात आला आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असून त्यांना शिक्षाही ठोठावण्यात आलेली आहे. समाजात कोणीही त्यांच्या साधकांना साहाय्य करत नाही; मात्र सनातन संस्था सत्याची बाजू घेत निर्भीडपणे हा दिवस प्रसिद्ध करते. याविषयी त्यांच्या एका साधकाने कौतुक केले.

साधकाने याविषयी हिंदी भाषेत एक ‘पोस्ट’ बनवून ती सामाजिक प्रसारमाध्यमातून प्रसारित केली आहे. ती मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘सनातन पंचांगामध्ये पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या अवतरण दिवसाची नोंद मोठ्या आदराने केलेली आहे. त्यासाठी आमचे कोट्यवधी साधक सनातन संस्थेचे आभारी आहेत. संकटकाळी ब्रह्मज्ञानी गुरूंचा महिमा समाजासमोर मांडणे, हे सत्यनिष्ठतेचे ज्वलंत उदाहरण आहे. सनातन संस्थेचे साधक धन्य आहेत. यापूर्वीही सनातन संस्थेच्या अधिवक्त्यांच्या वतीने बापूजींना याचिकेच्या माध्यमातून मोठी सफलता मिळवून देऊन त्यांना भोजन आणि औषधे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात