कथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणी ठाणे येथील सनातनचे साधक हरि प्रभु यांची पोलिसांकडून चौकशी

सनातनच्या साधकांच्या मागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा चालूच

वारंवार चौकशी करून सनातनच्या निरपराध साधकांना नाहक छळणारे पोलीस जनतेला न्याय काय देणार ? अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची केली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !

‘९.४.२०१९ या दिवशी दुपारी १ वाजता ठाणे येथील साधक श्री. हरि प्रभु यांची पोलीस ठाण्यातील विशेष पथकातील हवालदार मोरेश्‍वर बाबर आणि त्यांचे साथीदार पोलीस कृष्णा भेरे यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन चौकशी केली. प्रारंभी साधक श्री. प्रभु यांनी हे दोन्ही पोलीस आल्यावर त्यांना येण्याचे कारण विचारले; मात्र पोलिसांनी त्यांना येण्यामागचे कारण न सांगता ‘आधी तुमची माहिती सांगा’, असे सांगितले. त्यानंतर श्री. प्रभु यांनी त्यांचे वय, ते नोकरीतून कधी निवृत्त झाले, सध्या करत असलेली धर्मप्रसाराची सेवा, आदी माहिती सांगितली. शेवटी हवालदार बाबर यांनी ‘कोल्हापूरचे गोविंद पानसरे यांच्याविषयी काही माहीत आहे का ?’, असा प्रश्‍न विचारला. त्या वेळी श्री. प्रभु यांनी ‘मला त्यांच्याविषयी काहीही माहीत नाही’, असे सांगितले. त्यानंतर हवालदारांनी ही सर्व माहिती एका कागदावर लिहून त्यावर श्री. प्रभु यांची स्वाक्षरी घेतली आणि ते निघून गेले.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात