इंडियन एक्सप्रेसकडून सनातनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न

(म्हणे) ‘एन्आयएच्या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये अनेक हिंदूंचा समावेश !’

  • काँग्रेसनंतर आता हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांचा हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न ! 
  • ‘हिंदु आतंकवाद’ असे काही असते, तर आतापर्यंत एकतरी काँग्रेसवाले किंवा इतर धर्मीय जिवंत राहिले असते का ? आणि प्रसारमाध्यमांना हिंदूंना आतंकवादी म्हणण्याचे धारिष्ट्य झाले असते का ? 
  • क्रूर इस्लामी आतंकवाद्यांनी जगभरात धुडगूस घातला असतांना त्यावर ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ अशी नेहमीची तबकडी वाजवणारे हिंदूंना मात्र लगेच आतंकवादी ठरवतात, हा त्यांचा दुतोंडीपणा लक्षात घ्या !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) घोषित केलेल्या पसार आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये अनेक हिंदूंचाही समावेश आहे आणि त्यांच्या विरोधात ‘रेड कॉर्नर नोटीस’ही काढण्यात आली आहे, अशा प्रकारचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘महाराष्ट्र टाइम्स’सह काही फुटकळ वृत्तसंकेतस्थळांनी प्रसिद्ध केले आहे. (एन्आयएच्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘हिंदू आतंकवादी आहेत’, हे दाखवण्याचा प्रयत्न हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आता करू लागली आहेत ! अशी प्रसारमाध्यमे काँग्रेसच्या ताटाखालची मांजरे (कि बोके ?) झाली आहेत, हे न समजायला हिंदू दुधखुळे नाहीत ! – संपादक) मोदी यांनी काँग्रेसने हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून अशाप्रकारचे वृत्त या प्रसारमाध्यमांनी जाणीवपूर्वक देऊन हिंदू आतंकवादी आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे की,

‘एन्आयएच्या संकेतस्थळावर पसार आतंकवाद्यांच्या सूचीचा एक भाग आहे. त्यात वेगवेगळ्या धर्मांच्या आरोपींचा समावेश आहे. यात नक्षलवाद्यांचाही समावेश असून त्यांच्यावर इतर आतंकवाद्यांपेक्षा अधिक बक्षीस लावण्यात आलेले आहे. माओवादी नेता लक्ष्मण राव उपाख्य गणपति याच्यावर सर्वाधिक १५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. (नक्षलवाद्यांची नावे ही हिंदु धर्मानुसार असली, तरी ते धर्म न मानणारे आणि कम्युनिस्ट विचारसरणीनुसार आचरण करणारे असतात. त्यामुळे त्यांना हिंदु धर्मीय संबोधणे, ही बौद्धिक दिवाळखोरी आहे ! वास्तविक हे प्रसारमाध्यमांना ठाऊक आहे; मात्र हिंदुद्वेषाचा कंड शमवण्यासाठी हा सर्व खटाटोप आहेत ! – संपादक) तो प्रथम श्रेणीचा आतंकवादी आहे. रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे यांचाही या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये समावेश असून समझोता एक्सप्रेस स्फोट आणि मक्का मशीद स्फोट या प्रकरणात हे दोघेही पसार आहेत. (हे तिघेही पसार आहेत; मात्र त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, तरी प्रसारमाध्यमे त्यांना आतंकवादी कसे ठरवू शकतात ?  – संपादक)

यात पुढे लिहिले आहे, ‘याच सूचीतील ब्रज किशोर गिरी नावाच्या एका आरोपीवर बिहारच्या मोतिहारी रेल्वे रूळावर प्रेशर कुकर बॉम्ब ठेवण्याचा आरोप असून त्याच्या विरोधात खटला चालू आहे. या प्रकरणात मोतीलाल पासवान, उमाशंकर पटेल आणि मुकेश यादव यांना अटक करण्यात आली असून हे सर्व हिंदू आहेत.’ (इतर वेळेला ‘न्यायालय निकाल देत नाही, तोपर्यंत कोणाला दोषी ठरवता येत नाही’, असे सांगायचे; मात्र हा नियम हिंदूंना लागू करायचा नाही, हे संतापजनक ! – संपादक)

 

इंडियन एक्सप्रेसकडून सनातनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न

‘इंडियन एक्सप्रेस’ने त्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या वृत्तात हिंदू हे आतंकवादी असल्याचे दाखवण्याचा आणि ‘त्यांना शिक्षाही झाली आहे’, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्याने जयपूर येथील एन्आयएच्या विशेष न्यायालयाने ८ मार्च २०१७ या दिवशी संघप्रचारक सुनील जोशी, देवेंद्र गुप्ता आणि भावेश पटेल यांना वर्ष २००७ च्या अजमेर दर्ग्याच्या प्रकरणी शिक्षा झाल्याचे म्हटले आहे. तसेच या वृत्तात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने १२ हिंदुत्वनिष्ठ गटांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्राचा उल्लेख करून त्यातील माहिती दिली आहे. या आरोपपत्रात म्हटले आहे की, ‘हे आरोपी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांचे सदस्य आहेत. त्यांना तथाकथित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करायचे आहे. याचा उल्लेख मराठी पुस्तक ‘क्षात्रधर्म साधना’मध्ये असून ते सनातन संस्थेने प्रसिद्ध केले आहे.’(आरोपपत्रावर सुनावणी होऊन त्याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे; मात्र अशा प्रकारेे सनातनची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न सातत्याने प्रसारमाध्यमे करत आहेत. अशांच्या विरोधात सनातन कायदेशीर कारवाई करण्यासाठी अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)

शेवटी सनातन संस्थेवर बंदीची मागणी महाराष्ट्रातील पूर्वीच्या काँग्रेस सरकारने केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. (ही बंदी तत्कालीन काँग्रेस सरकारने फेटाळून लावली होती, हे सत्य नेहमीच दडपले जाते. यावरून प्रसारमाध्यमांची सनातनद्वेषी मानसिकता लक्षात येते ! – संपादक)

 

(म्हणे) ‘सनातन संस्थेशी संबंधितांचेही आतंकवाद्यांच्या सूचीत नाव !’

  • ‘हिंदु आतंकवाद’ असे काही असते, तर आतापर्यंत एकतरी काँग्रेसवाले किंवा इतर धर्मीय जिवंत राहिले असते का ? आणि प्रसारमाध्यमांना हिंदूंना आतंकवादी म्हणण्याचे धारिष्ट्य झाले असते का ? 
  • क्रूर इस्लामी आतंकवाद्यांनी जगभरात धुडगूस घातला असतांना त्यावर ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ अशी नेहमीची तबकडी वाजवणारे हिंदूंना मात्र लगेच आतंकवादी ठरवतात, हा त्यांचा दुतोंडीपणा लक्षात घ्या ! 

वृत्तात पुढे म्हटले आहे, ‘या व्यतिरिक्त रुद्र पाटील, प्रविण लिमकर आणि सारंग अकोलकर यांचाही या सूचीत समावेश आहे. रुद्र पाटील याच्यावर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संशय असून सारंग अकोलकरवर दाभोलकर यांच्या हत्येचा संशय आहे. पाटील, लिमकर आणि अकोलकर हे तिघेही सनातन संस्थेशी संबंधित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (कोणाच्या हत्येचा केवळ संशय असणारे आतंकवादी असू शकतात का ? – संपादक) वर्ष २००९ मध्ये गोव्यातील मारगाव (स्फोट कुठे झाला हेही चुकीचे छापणार्‍या महाराष्ट्र टाइम्सचे वृत्त किती उथळ आहे, हे लक्षात येते ! – संपादक) येथील बॉम्बस्फोट प्रकरणी सोमराज जय प्रकाश उपाख्य अण्णा हा पसार असून या सर्वांच्या विरोधात ‘इंटरपोल’ने ‘रेड कॉर्नर नोटीस’ही जारी केली आहे.’ (मडगाव स्फोटातील सनातन संस्थेच्या ६ जणांना न्यायालयाने यापूर्वीच निर्दोष ठरवले आहे, तसेच निकाल देतांना अन्वेषण यंत्रणांवर कोरडे ओढले आहेत. ही माहिती झाकून ठेवून हिंदूंना अपकीर्त करण्याचा हा अश्‍लाघ्य प्रयत्न होय ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात