सनातनच्या भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी करायची सिद्धता या आगामी ग्रंथासाठी उपयुक्त सूत्रे पाठवा !

साधक आणि वाचक यांना आवाहन !

भावी भीषण आपत्काळाला सामोरे जाण्याची विविध स्तरांवरील सिद्धता आतापासूनच कशी करावी, हे थोड्याफार प्रमाणात तरी कळावे, यासाठी काही क्षेत्रांतील सूत्रांचा (मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तींमध्ये रक्षण होण्यासाठी काय करावे; अन्न-पाण्यावाचून उपासमार न होण्यासाठी काये करावे; आगामी आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदींची होणारी अनुपलब्धता लक्षात घेऊन विकार-निर्मूलनाच्या दृष्टीने काय करावे; आर्थिक स्तरावर काय करावे आदी सूत्रांचा) थोडक्यात समावेश असणारा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा लेख ६.१.२०१९ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या लेखाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांतील जाणकारांना किंवा साधकांना काही उपयुक्त सूत्रे लक्षात आल्यास त्यांनी ती [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर येत्या ५ – ६ दिवसांत पाठवावीत. यामुळे हा विषय समाजापुढे सखोलपणे मांडण्यास साहाय्य होईल. (सध्या या विषयावरील ग्रंथ सिद्ध करण्याची प्रक्रिया चालू आहे.) 

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.