(म्हणे) ‘सनातन आणि काश्मीरमधील आतंकवादी हे दोन्ही आतंकवादीच !’ – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

काहीही संबंध नसतांना कुठून तरी राष्ट्रभक्त सनातन संस्थेचे नाव वारंवार आतंकवादी म्हणून घ्यायची सवयच हिंदुद्वेषी पृथ्वीराज चव्हाण यांना लागली आहे, हेच यातून लक्षात येते ! सनातन संस्थेची अशी अपकीर्ती करणारे चव्हाण यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !

मुंबई – महाराष्ट्रातील सनातन संस्था असो किंवा काश्मीरमधील आतंकवादी असो, आमच्या दृष्टीने सर्व आतंकवादीच आहेत. एका जातीचे असतील, तर ते आतंकवादी आणि दुसर्‍या जातीचे असतील, तर ते आतंकवादी नाहीत, असे काँग्रेस मानत नाही, असे हिंदुद्वेषी प्रतिपादन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. वर्धा येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. (ज्यांना जात, धर्म आणि पंथ यांतील भेदही कळत नाही, अशांनी सनातनविषयी बोलणे हास्यास्पद होय ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात