हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधकांना ऊर्जा देण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या त्यांच्या पादुकांचे कोच्ची (केरळ) येथील सेवाकेंद्रात आगमन आणि प्रतिष्ठापना !

श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वादस्वरूप
लाभलेल्या ‘श्रीं’ बीजमंत्रांकित पदकाचीही झाली प्रतिष्ठापना !

श्री गुरुपादुकांचे पूजन करतांना श्री. वाल्मीक भुकन आणि पूजा सांगतांना श्री. रूपेश रेडकर

कोच्ची (केरळ) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधकांना अखंड चैतन्यस्रोत पुरवणार्‍या, साधनेसाठी वरदानस्वरूप लाभलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भृगु महर्षींच्या आज्ञेने हस्तस्पर्श केलेल्या पादुकांचे येथील सेवाकेंद्रात फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया, म्हणजेच २२ मार्च या शुभदिनी आगमन झाले आणि प्रतिष्ठापना पूजा झाली. सकाळी ११.१० वाजता सेवाकेंद्रात गुरुपादुकांचे आगमन झाले आणि त्यानंतर षोडशोपचार पूजन करून सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी भृगु महर्षींनी सनातनच्या साधकांना आशीर्वादस्वरूपात दिलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या ‘श्रीं’ बीजमंत्रांकित पदकाचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. सनातनच्या साधिका सौ. अवनी लुकतुके यांनी पादुकांचे औक्षण केले. सध्या केरळमध्ये सेवेनिमित्त आलेले रामनाथी येथील सनातन आश्रमातील साधक श्री. वाल्मीक भुकन यांना श्री गुरुपादुका आणि ‘श्रीं’ बीजमंत्रांकित पदकाचे पूजन अन् प्रतिष्ठापना करण्याचे सौभाग्य लाभले. सनातनचे साधक श्री. रूपेश रेडकर यांनी या पूजाविधीचे पौरोहित्य केले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद भरतन् आणि त्यांच्या पत्नी याही उपस्थित होत्या.

कोच्ची सेवाकेंद्रात स्थापन करण्यात आलेल्या गुरुपादुका

रामनाथी (गोवा) येथील आश्रमात गुरुपादुका पूजन सोहळा झाल्यानंतर सनातनच्या सर्वत्रच्या साधकांना श्रीगुरूंच्या निर्गुण चैतन्याचा लाभ व्हावा, यासाठी पादुकांची विविध ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात यावी’, असे चेन्नई येथील श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या माध्यमातून भृगु महर्षींनी सांगितले आहे. त्यानुसार कोच्ची (केरळ) येथील सेवाकेंद्रात हा सोहळा पार पडला. श्री गुरुपादुकांचे, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच सूक्ष्मातून सेवाकेंद्रात आगमन झाल्याने सर्व साधकांना अत्यानंद झाला. गुरुपादुकांच्या दर्शनाने साधकांची भावजागृती झाली.

अनुभूती

‘आज सकाळी ६.५० पासून सेवाकेंद्रातील स्वागतकक्षातील वातावरण (ध्यानमंदिराच्या बाहेरील खोली) थंड वाटत होते’, असे साधकांनी अनुभवले. एरव्ही येथील वातावरण पुष्कळ उष्ण असून पंख्याविना तेथे थांबता येत नाही; पण आज वेगळाच थंडावा जाणवत होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात