हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रवचनकार आणि लेखक

डोंबिवली – आज लोकांना जे खरे आहे, ते द्यायला हवे. श्रीराम समजून घ्यायचा असेल, तर रावण हवाच. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर औरंगजेब हवा आणि हिटलर समजून घ्यायचा असेल, तर स्टॅलिन हवा. जगात सर्वांत जास्त हिंसा घडवणारे डावे विचारवंत आणि मुसलमान आहेत. जे सांगू जे लिहू त्याप्रमाणे वागणे, याला विचारवंत म्हणतात. हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातन संस्थेच्या मागे लागले आहेत, असे प्रतिपादन प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

९ मार्च या दिवशी डोंबिवली (पूर्व) येथील शास्त्री सभागृहात ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक श्री. भाऊ तोरसेकर हे प्रमुख पाहुणे, तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यासह चित्पावन ब्राह्मण संघाचे श्री. माधवराव घुले आणि ‘पै फ्रेंड्स’ वाचनालयाचे श्री. पुंडलिक पै यांचीही उपस्थिती होती.

डॉ. शेवडे पुढे म्हणाले की, भारतातील उजवे हे हिंदुत्वनिष्ठ आहेत. ते मुळातच सहिष्णू असल्यामुळे त्यांच्यामध्ये हिंसक विचार येतच नाहीत. याउलट जगात ख्रिस्ती आणि मुसलमान हे मूलतः दोन पंथ आहेत. त्यांच्या मते एकच ईश्‍वर आहे आणि त्याला तुम्ही मान्य करा अन्यथा मरा. हा मूलतत्त्ववाद आहे. हिंदुत्ववाद सत्य आणि अहिंसा या गुणांवर आधारित आहे. हा आमचा मूलतत्त्ववाद आहे. आमच्यात नास्तिक (आस्तिक) हिंदूच आहेत आणि नास्तिकही हिंदूच आहेत; पण मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या पंथात तसे नाही आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात