रामनाथी आश्रमात ‘उद्वाहन यंत्र’ (लिफ्ट) बसवण्यासाठी धनरूपात साहाय्य करा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘गोवास्थित सनातन संस्थेचा रामनाथी आश्रम म्हणजे अनेक संतांचे वास्तव्य असलेली पावन वास्तू ! भारतभरातील, तसेच विदेशातील अनेक जिज्ञासू आणि हितचिंतक आश्रमात येेऊन धर्मशिक्षण अन् साधना यांविषयी जाणून घेतात. संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदीही आश्रमाला सदिच्छा भेट देत असतात. आश्रमात येणार्‍या विविध वयोगटांतील अतिथींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आश्रमाची एकंदरीत व्याप्ती पहाता अतिथींच्या सोयीसाठी, तसेच आश्रमातील वयस्कर आणि रुग्णाईत साधकांसाठी उद्वाहन यंत्र (लिफ्ट) बसवण्याची नितांत आवश्यकता आहे. या उद्वाहन यंत्राविषयीची अधिक माहिती पुढील सारणीत दिली आहे.

टीप १ : उद्वाहन यंत्र बसवण्यासाठी बांधाव्या लागणार्‍या भिंती.

जे वाचक, हितचिंतक वा धर्मप्रेमी उद्वाहन यंत्र खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी स्वतःची माहिती कळवावी.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’