हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील उत्तिरकोसमंगै येथील मंदिरात केली पूजा !

उत्तिरकोसमंगै येथील मंदिरासमोर उभे असलेले डावीकडून श्री. सत्यकाम कणगलेकर, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, श्री. दिवाकर आगावणे आणि श्री. विनायक शानभाग
उत्तिरकोसमंगै (रामनाथपूरम्) या प्राचीन गावातील ‘मंगलेश्‍वरी समेत मंगलनाथ स्वामी’ मंदिराचे प्रवेशद्वार
मंदिराच्या पुष्करिणीच्या समोरील ३ सहस्र वर्षांपेक्षाही अधिक पुरातन असलेला ‘बोराचा वृक्ष’

रामनाथपूरम् (तमिळनाडू) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ११.१.२०१९ या दिवशी तमिळनाडूतील रामनाथपूरम् जिल्ह्यातील उत्तिरकोसमंगै या गावातील ‘मंगलेश्‍वरी समेत मंगलनाथ स्वामी’ मंदिरात जाऊन विशेष पूजा केली.

महर्षि मयन यांनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून ५.१.२०१९ या दिवशी सांगितले, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी, सनातनच्या साधकांचे शारीरिक त्रास न्यून होण्यासाठी आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी भूमी मिळण्यातील अडथळे दूर होण्यासाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी उत्तिरकोसमंगै येथील ‘मंगलेश्‍वरी समेत मंगलनाथ स्वामी’ मंदिरात जाऊन पूजार्चना करावी.’ महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या मंदिरात गेल्या होत्या. या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मंदिराच्या पूर्वेकडे असलेल्या नटराजाच्या मूर्तीचेही दर्शन घेतले. ही मूर्ती ६ फूट उंचीची असून ती हिरव्या पाचूची आहे.

 

उत्तिरकोसमंगै येथील ‘मंगलेश्‍वरी समेत मंगलनाथ स्वामी’ मंदिर !

तमिळनाडू राज्यातील दक्षिणेला रामनाथपूरम् हा जिल्हा आहे. याच जिल्ह्यात ‘रामेश्‍वरम्’ तीर्थक्षेत्र आहे. मदुराईकडून रामेश्‍वरम्ला जातांना रामनाथपूरम् शहर आहे. या शहरापासून १० कि.मी. दूर ‘उत्तिरकोसमंगै’ नावाचे प्राचीन गाव आहे. ‘उत्तिर’ म्हणजे उपदेश किंवा वेद, ‘कोस’ म्हणजे ‘रहस्य’ आणि ‘मंगै’ म्हणजे ‘पार्वती’ होय. या ठिकाणी भगवान शिवाने देवी पार्वतीला वेदांचे रहस्य सांगितल्याने तमिळ भाषेत या गावाला ‘उत्तिरकोसमंगै’ असे नाव पडले. येथील स्वयंभू शिवलिंग ३ सहस्र वर्षांपेक्षाही प्राचीन आहे. याचा पुरावा म्हणजे तेथील मंदिराच्या पुष्करिणीच्या समोर असलेला ‘बोराचा वृक्ष’ होय. हा बोराचा वृक्ष या मंदिराचा स्थलवृक्ष आहे. हा वृक्ष ३ सहस्र वर्षांपेक्षाही अधिक पुरातन आहे.

क्षणचित्रे

१. या मंदिराकडे जात असतांना वाटेत सुंदर अशा मुंगुसाचे दर्शन झाले.

२. या मंदिरातील मंगलेश्‍वरीदेवीच्या मंदिरात एक विशेष ऊर्जा जाणवली ! – सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात