सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती देत असलेेले धर्मशिक्षण सर्वांना देण्याची आवश्यकता आहे – स्वामी विज्ञानानंद सरस्वती महाराज

हिंदूंना जागृत करण्याचे महान कार्य तुम्ही करत असल्याने
तुमचा विजय निश्‍चित आहे ! –  स्वामी विज्ञानानंद सरस्वती महाराज

प्रयागराज (कुंभनगरी) – आपल्या गुरुदेवांमध्ये देवच आहे. हिंदूंना जागृत करण्याचे महान कार्य तुम्ही करत आहात. आपला विजय निश्‍चित आहे, असे प्रतिपादन उत्तराखंड राज्याच्या कनखल येथील स्वामी विज्ञानानंद सरस्वती महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, तसेच महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समितीचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

स्वामी विज्ञानानंद सरस्वती महाराज यांचा पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

या प्रसंगी विज्ञानानंद सरस्वती पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही देत असलेेले धर्मशिक्षण सर्वांना देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या गुरूंचा चांगला प्रयत्न आहे. तुम्ही गीता आणि वेद यांचा प्रसार करत आहात. मी देखील हे धर्मशिक्षणाचे लिखाण छापून शिक्षणमंत्र्यांना शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सांगणार आहे. तुम्ही एवढ्या लांब येऊन येथे धर्मशिक्षण देत आहात, ही एकप्रकारे तपश्‍चर्याच आहे. जो ‘विश्‍वाचे कल्याण व्हावे’, असा विचार करतो, त्याचे नेहमीच कल्याण होते. अंतिमत: विजय आपलाच होणार आहे. भारत नष्ट होणार नाही, हे राक्षसच नष्ट होणार आहेत. जे दुष्ट मानवता नष्ट करू पहातात, त्यांची बुद्धी भगवंतच शुद्ध करो !’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात