कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मशिक्षण आणि राष्ट्र-धर्मरक्षण यांविषयीच्या फलक प्रदर्शनाचे आयोजन

कुंभमेळा प्रयागराज २०१९

 

सनातन संस्थेच्या वतीने धर्मशिक्षण
आणि राष्ट्र-धर्मरक्षण यांविषयीची फलक प्रदर्शनी

प्रयागराज – कुंभमेळ्याच्या मंगलसमयी सनातन संस्थेने सेक्टर १५ मध्ये मोरीमार्ग-मुक्ती मार्ग चौकात धर्मशिक्षण आणि राष्ट्र-धर्मरक्षण यांविषयीच्या फलक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये संस्कृतीचे पालन, देवालय दर्शन, धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र, देवतांची उपासना, साधना आणि धर्मशिक्षणासंबंधी तसेच गंगेचे रक्षण, गोरक्षण, मंदिरांचे रक्षण, क्रांतीकारकांचे स्मरण, हिंदु राष्ट्र, सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन आदी राष्ट्र-धर्म रक्षणासंबंधी विषयांचा समावेश आहे. हे प्रदर्शन प्रतिदिन सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले राहील. सर्व श्रद्धाळू, संत, पत्रकार, विद्यार्थी यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी केले आहे. या प्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने पत्रक काढण्यात आले आहे.

याविषयी संस्थेने प्रसारित केलेल्या पत्रकात ‘सध्याच्या लोकशाहीत कॉन्व्हेंट शाळेत बायबल आणि मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते; परंतु सामान्य हिंदूंना त्यांच्या धर्मासंबंधी ज्ञान देणारी कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे ‘सनातन धर्म म्हणजे काय ?’, ‘त्याचे आचरण कसे करावे ?’, हे हिंदूंना ठाऊक नाही. ‘हिंदूंना सोप्या भाषेत धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न करणे’, हाच सध्याच्या काळातील श्रेष्ठ धर्मप्रसार आहे. याशिवाय राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी हिंदु समाजाला जागृत करणे, हेसुद्धा श्रेष्ठ कार्य आहे’, असे म्हटले आहे.

सनातन संस्थेच्या फलक प्रदर्शनाची वेळ

स्थळ : सेक्टर १५, मोरी मार्ग-मुक्ती मार्ग चौक, प्रयागराज.

वेळ : सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात