संक्रांतीच्या दिवशी संशयित अमित डेगवेकर यांना अटक करून २३ जानेवारीअखेर पोलीस कोठडी

कॉ. पानसरे हत्या प्रकरण

  • तथाकथित आरोपांवरून हिंदु सणांच्या दिवशीच हिंदूंना अटक करून त्यांना अपकीर्त करण्याचे अन्वेषण यंत्रणांचे षड्यंत्र ! 
  • या प्रकरणातील पहिला संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांनाही ऐन श्री गणेशचतुर्थीच्या तोंडावर अटक करण्यात आली होती. आताही ऐन संक्रांतीच्या दिवशी अमित डेगवेकर यांना अटक करून पोलिसांनी सणांच्या दिवशी छळण्याचे प्रकार चालूच ठेवले आहेत.

कोल्हापूर, १५ जानेवारी (वार्ता.) – कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या विशेष पोलीस पथकाने कॉ. पानसरे हत्या प्रकरणात ८ वा संशयित आरोपी म्हणून श्री. अमित डेगवेकर यांना अटक करून १५ जानेवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित केले. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे यांनी युक्तीवाद केला, तर श्री. अमित डेगवेकर यांच्या बाजूने अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी युक्तीवाद केला. या वेळी अधिवक्त्या स्मिता शिंदे उपस्थित होत्या. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.जी. सोनी यांनी श्री. डेगवेकर यांना २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. श्री. अमित डेगवेकर यांना प्रतिदिन सायंकाळी ५ ते ६ या वेळेत अधिवक्त्यांना भेटण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.

या वेळी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केलेला युक्तीवाद

१. यापूर्वीही कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले अमोल काळे, भरत कुरणे, वासुदेव सूर्यवंशी यांना अटक करतांना जी कारणे देण्यात आली होती, तीच कारणे याही वेळी पोलीस देत आहेत.

२. यापूर्वी आजपर्यंत ज्यांना अटक केली, त्यांच्याकडून ज्या कारणांसाठी अटक केली, त्यातील गाडी, तसेच हत्या करण्यासाठी वापरण्यात येणारे अग्नीशस्त्र (पिस्तुल) हस्तगत करण्यात आलेले नाही. पोलिसांना काहीच करायचे नसून अन्य गुन्ह्यांत अटक केलेल्या संशयितांना अटक करून त्यांनाही कॉ. पानसरे हत्येमध्ये निष्कारण अडकवण्यात येत आहे.

३. ज्यांचा यापूर्वी दाखल झालेल्या आरोपपत्रांमध्ये उल्लेख नाही, असे नवनवीन आरोपी पोलीस अटक करून आणत आहेत. त्यामुळे अमित डेगवेकर यांना ३ दिवसांपेक्षा अधिक दिवस पोलीस कोठडी देण्यात येऊ नये.

सरकारी पक्षाच्या वतीने पोलीस कोठडी मिळण्यासाठी दाखवण्यात आलेली काही कारणे

१. अमित डेगवेकर हा डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि अमोल काळे यांच्या समवेत धर्मकार्यासाठी (दुर्जनांचा नाश आणि नुकसान) करावयाच्या प्रत्येक नियोजनात सहभागी होता.

२. अमित डेगवेकर हा डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि अमोल काळे यांच्या समवेत विविध ठिकाणी तरुणांना धर्मकार्यासाठी प्रोत्साहित करण्यास आणि त्यांना शस्त्र अन् बॉम्बस्फोट यांचे प्रशिक्षण देण्याच्या ठिकाणी उपस्थित रहात असे. त्यामुळे कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अमित डेगवेकर याने कोणकोणत्या सदस्यांना प्रोत्साहित करून त्यांना कोणकोणत्या ठिकाणी प्रशिक्षण दिले, याचे अन्वेषण करायचे आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात