आपत्काळात सनातनचे सर्वत्रचे साधक आणि आश्रम यांचे रक्षण होण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या प्रवेशद्वारावर ऐरावत गजमूर्तींची स्थापना !

आश्रमाच्या प्रवेशद्वारावर ऐरावत गजमूर्तींची स्थापना करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सोबत मंत्रपठण करतांना पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी (उजवीकडे) आणि श्री. अमर जोशी

रामनाथी, गोवा – सनातनचे सर्वत्रचे साधक आणि सर्व आश्रम यांचे रक्षण व्हावे, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार १५ जानेवारीला सकाळी येथील सनातन आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते आणि पुरोहितांच्या मंत्रघोषात भावपूर्ण वातावरणात २ ऐरावत गजांच्या मूर्तींची विधीवत स्थापना करण्यात आली. या वेळी सनातन संस्था आणि एस्एस्आर्एफ् यांच्या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली.

१४ आणि १५ जानेवारी, असे २ दिवस झालेल्या या स्थापना सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते पूजेचा संकल्प करण्यात आला. यानंतर श्री महागणपति पूजन, इंद्रपूजन, ऐरावत गजपूजन, नवग्रह पूजन, वरुण पूजन, नवग्रहहोम आणि त्यानंतर इंद्रासाठी हवन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात