यवतमाळ येथे सकल जैन समाजाच्या वतीने सनातन संस्थेचे रवींद्र देशपांडे यांचा सत्कार !

सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ चांगले आहे – गुरुदेव रतनमुनीजी महाराज

सत्कार स्वीकारतांना श्री. रवींद्र देशपांडे (उजवीकडे)

यवतमाळ, ११ जानेवारी (वार्ता.) – सकल जैन समाजाच्या वतीने छत्तीसगड प्रवर्तक गुरुदेव रतनमुनीजी महाराज यांच्या महामंगलिक आणि प्रवचनाचा कार्यक्रम ८ जानेवारीला दर्डानगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री. परेशभाई लाठीवाला यांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला. प्रवचनानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या संघटनांच्या पदाधिकार्‍यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सनातन संस्थेचे श्री. रवींद्र देशपांडे यांचा माळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी सनातन संस्थेच्या वतीने गुरुदेव रतनमुनीजी महाराज यांना हिंदु जनजागृती समितीनिर्मित ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. ते म्हणाले, ‘‘आम्हीही लव्ह जिहादला बळी पडणार्‍या मुलींची सुटका केली आहे. सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. संस्थेच्या कार्याला आमचे आशीर्वाद आहे.’’

त्यानंतर आध्यात्मिक गुरु आणि भाजपचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार गुरु प्रेमासाई महाराज यांना २० जानेवारीला होणार्‍या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे निमंत्रण देण्यात आले. त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. या वेळी सकल जैन समाजाचे अधिवक्ता अमरचंदजी दर्डा, दैनिक सिंहझेपचे संपादक मनोज जयस्वाल आणि जिल्हा प्रतिनिधी विजय बुंदेला, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र डांगे यांच्यासह जैन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात