कुंभमेळ्यात ओडिशातील ‘क्रिया योग आश्रमा’च्या नामजप फेरीचे सनातन संस्थेच्या वतीने स्वागत

कुंभमेळा प्रयागराज २०१९

ओडिशातील ‘क्रिया योग आश्रमा’च्या नामजप फेरीचे फलकांद्वारे सनातनच्या साधकांनी केलेले स्वागत

प्रयागराज (कुंभनगरी), ११ जानेवारी (वार्ता.) – ओडिशातील ‘क्रिया योग आश्रमा’च्या नामजप फेरीचे कुंभमेळ्यातील सनातन संस्थेच्या प्रदर्शनस्थळासमोर आगमन झाले. या फेरीत २०० हून अधिक जण सहभागी झाले होते. या फेरीचे सनातन संस्थेच्या साधकांनी स्वागत केले. या वेळी ३ ठिकाणी साधकांनी ‘हार्दिक स्वागत’ असे फलक हातात धरले होते. साधकांनी फेरीत सहभागी असलेल्या जिज्ञासूंची आपुलकीने विचारपूसही केली.

सनातन संस्थेच्या साधकांनी फेरीचे स्वागत करताच, त्यात सहभागी झालेल्या भाविकांनी त्यांच्याकडील पारंपरिक वाद्य वाजवून त्यास अनुमोदन दिले.

प्रतिक्रिया

‘सनातन संस्थेने केलेल्या स्वागतामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आम्हाला पुष्कळ आनंद झाला. आम्हाला असे वाटले की, आम्ही देवभूमीतच आलो आहोत. आम्हाला देव भेटला आहे.’

– श्री. आनंद साहू, क्रिया योग आश्रम, ओडिशा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात