कुंभमेळ्याच्या (प्रयागराज) निमित्ताने धर्मकार्यात साहाय्य करण्याची अमूल्य संधी !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘१.१.२०१९ ते २८.२.२०१९ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभमेळा आहे. या काळात संपूर्ण भारतभरातून ३ कोटी भाविक प्रयागराज येथे येतात. या काळात सर्व देवता, अनेक संत आदी प्रयागक्षेत्री उपस्थित असतात. या मेळ्याच्या ठिकाणी आणि या काळात केलेल्या साधनेचे फळ अन्य स्थळकाळाच्या तुलनेने  १ सहस्र पटींनी अधिक मिळते.

 

१. प्रयागराज येथे होणार्‍या कुंभमेळ्यासाठी तेथील
स्वतःची वास्तू उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या निवासाच्या दृष्टीने, तसेच विविध सेवांसाठी प्रयागमध्ये वास्तूची (घर, सदनिका (फ्लॅट), सभागृह (हॉल) यांची) आवश्यकता आहे.

जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता प्रयागमधील स्वतःची वास्तू विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे. प्रयागमधील झूंसी, अलोपीबाग, अल्लापूर, सोहबतिया बाग, ‘टागोर टाऊन’, ‘जोरगे टाऊन’ या भागात ही वास्तू असल्यास सुलभ होईल; परंतु या व्यतिरिक्त अन्य भागांमधील वास्तूही चालू शकेल.

 

२. कुंभमेळ्याच्या सेवेसाठी सुस्थितीतील
दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !

कुंभकाळात धर्मप्रसाराची सेवा करण्यासाठी भारतभरातील अनेक धर्मप्रेमी आणि साधक प्रयाग येथे वास्तव्याला असणार आहेत. या काळात कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत.

साधक, वाचक, हितचिंतक वा धर्मप्रेमी यांच्याकडे सर्व कागदपत्रांची (आर्.सी बूक, पीयुसी, विमा (इन्शुरन्स) आदी) पूर्तता असलेली वरील प्रकारची वाहने असल्यास ते काही काळासाठी ती वापरायला देऊ शकतात.

साधकांचे नातेवाईक अथवा परिचित प्रयाग येथे रहात असल्यास आणि ते त्यांचे वाहन कुंभसेवेसाठी वापरायला देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.

 

३. धर्मप्रसार कार्यासाठी भारतभरातील १५०
धर्मप्रेमी आणि साधक यांचे २ मास कुंभक्षेत्री वास्तव्य !

या काळात साधनेसाठी अधिकाधिक वेळ दिल्यास देवता आणि संत यांचा आशीर्वाद लाभून इच्छित कार्य अल्पावधीत पूर्णत्वाला जाते. या पुण्यकाळाचा साधनेसाठी लाभ करून घेऊन धर्मप्रसार कार्य सर्वत्र पोहोचवण्याच्या उद्देशाने भारतभरातील १५० धर्मप्रेमी आणि साधक सेवेसाठी कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांचा ६० दिवसांच्या (२ मासांच्या) कुंभकाळामध्ये अल्पाहार आणि भोजन यांसाठी येणारा व्यय खाली दिला आहे.

कुंभमेळ्यानिमित्त येणारे धर्मप्रेमी आणि साधक यांच्यासाठी अल्पाहार (न्याहारी) अन् भोजन यांकरता धनरूपात साहाय्य करण्याची आवश्यकता आहे.

जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता साहाय्य करू शकतात, त्यांनी कृपया संपर्क साधावा.

इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

‘आॅनलाइन’ दान (अर्पण) करण्यासाठी पुढील ‘बटन’वर ‘क्लिक’ करा –       Donate     

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, गोवा.

अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व !

हिंदु धर्मशास्त्रामध्ये वर्णिलेल्या महादानांपैकी ‘अन्नदान’ हे महत्त्वाचे दान आहे. जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी प्रतिदिन अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यामुळे त्याने शक्य होईल तेवढे अन्नदान करावे. ‘सद्भावनेने ‘सत्पात्रे अन्नदान’ केल्यास अन्नदात्याला त्याचे उचित फळ मिळते, तसेच सर्व पातकांतून त्याचा उद्धार होऊन तो ईश्‍वराच्या जवळ जातो’, असे धर्मशास्त्र सांगते. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तींसाठी अन्नदान केल्यास अन्नदात्याला आध्यात्मिक स्तरावरही लाभ होतो. प्रयागक्षेत्री येणारे धर्मप्रेमी आणि साधक यांच्यासाठी अन्नदान केल्यास अन्नदानाचे फळ तर मिळेलच आणि त्याचबरोबर कुंभपर्वाचा आध्यात्मिक स्तरावरही लाभ होईल !