जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा ऐतिहासिक होणार ! – पत्रकार परिषदेचा सूर

डावीकडून श्री. संग्रामसिंह सूर्यवंशी, श्री. मोहन तिवारी, सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. प्रशांत जुवेकर आणि श्री. दत्तात्रेय वाघुळदे

जळगाव, १० जानेवारी (वार्ता.) –  प्रतिवर्षाप्रामाणे जळगाव जिल्ह्यातील तरुण वर्ग स्वतःचे पद, पक्ष, जात, सांप्रदाय बाजूला सारून एक ‘हिंदू’ म्हणून सभेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहे. या सभेला उच्चांक गाठणारी उपस्थिती राहील आणि ‘ही सभा ऐतिहासिक होईल’, असा ठाम विश्‍वास शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षेचे जळगाव महानगर प्रमुख श्री. मोहन तिवारी यांनी व्यक्त केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे रविवार, १३ जानेवारी या दिवशी होणार्‍या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’निमित्त ‘पद्मालय विश्रामगृह’ येथे १० जानेवारीला पत्रकार परिषद पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, श्रीराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संग्रामसिंह सूर्यवंशी, हिंदु महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. जुवेकर म्हणाले की, १०० हून अधिक गावांत सभेचा प्रसार झाला आहे. शहर आणि ग्रामीण भागात ८० हून अधिक बैठका घेऊन सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, रिक्शा उद्घोषणा, स्थानिक वृत्तवाहिन्या, डिजीटल होर्डिंग्ज, सोशल मिडीया, पोस्टर्स, २५ सहस्र हस्तपत्रके वाटप यांसह घरोघरी जाऊन प्रसार करण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात