देवीच्या चरणस्पर्शाची परंपरा समजून घेणे आवश्यक आहे ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवरील ‘लिमिटेड देवदर्शन’ या विषयावरील चर्चासत्र

सौ. नयना भगत

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भोपे पुजार्‍यांच्या धर्मपत्नींनी देवीच्या चरणांना स्पर्श करण्याची परंपरा आहे. शिवाजी महाराजांच्या काळात अफझलखानाने मूर्ती भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी आक्रमणामध्ये मूर्ती भ्रष्ट होऊ नये, यासाठी भोपे समाजाच्या पुजार्‍यांनी ही मूर्ती लपवून ठेवली होती. त्यानंतर या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. देवीची विटंबना रोखण्यासाठी त्यांनी केलेल्या या पराक्रमाविषयी शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये त्यांना हा मान देण्यात आला आहे. या दृष्टीने देवीच्या या चरणस्पर्शाची परंपरा समजून घेणे आवश्यक आहे, असे मत सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मांडले.

शिवाजी महाराजांच्या काळातील ही परंपरा का आहे, हे समजून न घेता मंदिरामध्ये प्रवेश करून चरणस्पर्श केलेल्या महिलांचे तृप्ती देसाई यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल पाटील यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात