सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले प्रयाग येथिल विशेष प्रदर्शन !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने
१४.१.२०१९ ते १९.२.२०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले विशेष प्रदर्शन !

प्रयागमध्ये आरंभ होणार्‍या कुंभमेळ्याच्या पावन समयी धर्मशिक्षण, धर्मरक्षण आणि धर्मजागृती करण्याच्या उद्देशांनी सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्तमानेे एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे, त्यांच्यामध्ये हिंदु धर्माप्रती अभिमान जागृत करणे आणि सर्व हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित करणे, या उद्देशांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती कार्यरत आहेत.

प्रदर्शनामध्ये प्रस्तुत केले जाणारे विषय

१. सात्त्विक ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन : याद्वारे धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदु धर्मात सांगितल्या गेलेल्या धार्मिक कृतींचे महत्त्व, तसेच त्यांच्याशी संबंधित अध्यात्मशास्त्रीय माहिती, सणांचे महत्त्व आणि ते कशा प्रकारे साजरे केले पाहिजेत ? आचारधर्म, विवाहविधी, ईश्वरप्राप्तीसाठी साधना आदी विषयांवरील माहिती देण्यात आली आहे.

२. धर्मरक्षणाशी संबंधित प्रदर्शन : यामध्ये गोरक्षा, गंगादी पवित्र नद्यांचे पावित्र्य राखणे, हिंदूंचे धर्मपरिवर्तन रोखणे इत्यादी विषयांवर माहिती देण्यात आली आहे.

३. राष्ट्ररक्षणाशी संबंधित प्रदर्शन : याद्वारे आपत्कालीन परिस्थितीमध्ये साहाय्य करणे, राष्ट्रध्वजाचा मान राखणे इत्यादी विषयांवर माहिती देण्यात आली आहे.

४. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केल्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि हिंदु धर्माची महानता या विषयावर आधारित प्रदर्शन

५. भारताचा प्राचीन गौरवशाली इतिहास आणि स्वातंत्र्यसैनिक या विषयांवर प्रकाश टाकणारे प्रदर्शन

६. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक अशा सुसंस्कारित आणि आदर्श पिढीच्या निर्माणासाठी प्रदर्शन

कालावधी : १४.१.२०१९ ते १९.२.२०१९
वेळ : सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत
प्रदर्शन स्थळ : मोरी मार्ग, भूखंड सं. ४, सेक्टर १५, मोरी-मुक्ति मार्ग चौक, प्रयागराज
संपर्क क्रमांक : ९३२४८६८९०६