१.१.२०१९ ते ३१.१२.२०१९ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादी उपाय

१. विविध चक्रांवर देवतांची चित्रे लावणे

‘देवतेचे चित्र शरिराला स्पर्श करून बाहेरच्या दिशेने मुख करून (निर्गुण) ठेवायचे कि आतल्या दिशेने मुख करून (सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी चित्रांचा नव्हे, तर नामपट्टीचा उपयोग करावा.

टीप १ – ‘पुढे’ म्हणजे शरिराचा चक्राशी संबंधित पुढचा भाग

टीप २ – ‘पाठी’ म्हणजे शरिराचा चक्राशी संबंधित पाठचा भाग

 

२. जप

सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. कालमाहात्म्यानुसार सर्वसाधारणपणे सध्या साधकांना होणार्‍या त्रासांपैकी ७० टक्के त्रास समष्टी स्तरावरील, तर ३० टक्के त्रास व्यष्टी स्तरावरील आहेत.

२ अ. उपाय म्हणून बसून जप करणारे साधक

यांनी जेवढा वेळ नामजप करणार त्याच्या ७० टक्के वेळ व्यष्टी उपायांसाठीचा ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’नुसार शोधून मिळालेला जप, सांगितलेला अन्य काही जप किंवा मंत्रजप असल्यास ते करावेत, तर ३० टक्के वेळ ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप समष्टीसाठी करावा.

शोधलेल्या उपायांचा २ – ३ आठवड्यांत लाभ न झाल्यास किंवा तीव्र त्रास असल्यामुळे उपाय शोधता येत नसल्यास ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या साधकांना किंवा संतांना विचारावे.

२ आ. उपाय म्हणून बसून जप न करणारे साधक

यांनी दिवसभरातील संपूर्ण वेळ ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप करावा. त्यांना जर काही त्रास होत असेल, तर त्यांनी त्रासाच्या तीव्रतेनुसार (टीप) तेवढ्या कालावधीसाठी उपायांसाठीचा जप बसून करावा आणि उर्वरित वेळ श्रीकृष्णाचा नामजप करावा.

टीप – मंद त्रास असल्यास १ ते २ घंटे उपाय करतात, मध्यम त्रास असल्यास ३ ते ४ घंटे आणि तीव्र त्रास असल्यास ५ ते ६ घंटे उपाय करतात.

 

३. मुद्रा

जाता-येतांना किंवा उपाय करण्याची आवश्यकता असल्यास करावयाची मुद्रा : तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावावे.

 

४. न्यास

लक्षणांनुसार विशिष्ट ठिकाणी न्यास करण्याची आवश्यकता नसल्यास मुद्रा केलेल्या एका हाताने अनाहतचक्रावर आणि दुसर्‍या हाताने मणिपूरचक्रावर न्यास करावा. उपायांसाठी देवतेचे चित्र लावलेल्या आज्ञा आणि विशुद्ध या चक्रांवर न्यास केल्यास समष्टी स्तरावरील आक्रमणांपासून सर्व शरिराचे रक्षण होत नाही. अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र यांवर न्यास केल्यास सर्व शरिराचे रक्षण होते.’

 

५. आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात सूचना !

५.१. उपायांसाठी देवतांची चित्रे लावणे

अ. १.१.२०१९ ते ३१.१२.२०१९ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादी उपाय यात सांगितल्याप्रमाणे सध्या साधक उपाय म्हणून आज्ञा आणि विशुद्ध या कुंडलिनीचक्रांवर श्रीकृष्णाचे चित्र लावत आहेत. सध्या कालमाहात्म्यानुसार जो एकंदरित समष्टी आध्यात्मिक त्रास वाढला आहे, तो न्यून होण्यासाठी हे उपाय उपयुक्त आहेत.

आ. प्रत्येकाला व्यक्तिगत स्तरावर निरनिराळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे त्रास होत असतात. यासाठी प्राणशक्तीवहन-उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून ते करणेही आवश्यक असते. ते उपाय शोधतांना आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र ही स्थाने सोडून त्रासाचे स्थान अन्यत्र आल्यास त्या ठिकाणी उपायांमधून शोधलेल्या त्या त्या तत्त्वाच्या देवतांची चित्रे लावावीत, उदा. अनाहतचक्र हे न्यासाचे स्थान आणि आकाशतत्त्वाचे उपाय आल्यास तेथे शिवाचे चित्र लावावे आणि ॐचा जप आल्यास ॐचे चित्र लावावे. समजा आज्ञाचक्र आणि मणिपुरचक्र ही स्थाने अन् वायुतत्त्वाचे उपाय आल्यास आज्ञाचक्रावर लावण्यास सांगितलेल्या श्रीकृष्णाच्या चित्रात पालट न करता केवळ मणिपुरचक्रावर हनुमानाचे चित्र लावावे.

कोणत्या तत्त्वासाठी कोणत्या देवतेचे चित्र लावावे ?, हे पुढे दिले आहे.

तत्त्व देवतेचे चित्र 
१. तेज श्री दुर्गादेवी
२. वायु श्री हनुमान
३. आकाश शिव

आ १. सूत्र आ मध्ये उल्लेखिलेल्या त्रासाच्या निवारणासाठी आज्ञा आणि विशुद्ध या चक्रांव्यतिरिक्त अन्य चक्रांवर शरिरावर पुढे आणि पाठीमागेही देवतेचे चित्र लावावे. देवतेचे चित्र सगुण लावायचे कि निर्गुण ?, हे पुढीलप्रमाणे ठरवावे – उपायांच्या वेळी करायची मुद्रा सगुण स्तराची असेल, तर देवतेचे चित्र सगुण पद्धतीने लावावे आणि मुद्रा सगुण-निर्गुण किंवा निर्गुण स्तराची असेल, तर देवतेचे चित्र निर्गुण पद्धतीने लावावे.

इ. प्राणशक्तीवहन-उपाय पद्धतीनुसार उपाय शोधता आले नाहीत, तर सनातनच्या विकारांनुसार नामजप-उपाय या ग्रंथात दिल्यानुसार स्वतःला होणार्‍या त्रासावर उपयुक्त असलेला नामजप करता येतो. अशा वेळी त्या ग्रंथात दिलेल्या न्यासस्थानी संबंधित देवतेचे चित्र लावावे.

ई. उपायांसाठी देवतांची चित्रे दिवसा आणि रात्री झोपतांनाही शरिरावर लावावीत. ही चित्रे प्रत्येक १२ घंट्यांनी (तासांनी) पालटावीत, तसेच प्रत्येक वेळी त्यांची शुद्धीही करावी.

उ. उपायांसाठी शक्यतो देवतांची सात्त्विक चित्रे लावावीत. अशी चित्रे उपलब्ध न झाल्यास देवतांच्या सात्त्विक चित्रांच्या नामजप-पट्ट्या लावाव्यात. अशी नामजप-पट्टीही उपलब्ध नसेल, तर देवतेचा नामजप एका लहान कागदावर लिहून तो कागद लॅमिनेट करून ती पट्टी उपाय म्हणून लावावी.

५.२. मुद्रा करतांना हात दुखू लागल्यास मानस, म्हणजे मनाने मुद्रा करावी.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०१९)