समष्टी कल्याणासाठी लाखो कि.मी.चा दैवी प्रवास करणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !

१. असा दैवी प्रवास करणार्‍या सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ या एकमेवाद्वितीय आहेत !

एप्रिल २०१५ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या प्रवासाला ‘दैवी प्रवास’ असेच म्हणता येईल. मलाही एवढा प्रवास करता आला नाही. असा प्रवास करणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या एकमेवाद्वितीय आहेत.’’

२. युद्ध चालू असतांनाही ईश्‍वर तुमच्याकडून प्रवास करवून घेईल !

मार्च २०१८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना म्हणाले, ‘‘वर्ष २०२० मध्ये युद्ध चालू होईल. त्या वेळीही तुम्हाला प्रवास करायचा आहे. युद्ध चालू असतांनाही ईश्‍वर तुमच्याकडून प्रवास करवून घेईल.’’

कुमारकोम (केरळ) येथे बोटीतून प्रवास करतांना सद्गुरु काकू

 

कोणार्क मंदिर (ओडिशा) येथे सद्गुरु काकू

 

ऊटी (तमिळनाडू) येथील चहाच्या मळ्यात सद्गुरु काकूंचे काढलेले छायाचित्र

 

मुन्नार (केरळ) येथे बोटीतून प्रवास करतांना सद्गुरु काकू आणि सनातनचे साधक

 

मुन्नार (केरळ) येथे चित्रीकरण करतांना सद्गुरु काकू

१. दैवी प्रवासाची वैशिष्ट्ये

१ अ. देश-विदेशांत प्रवास करणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ७ वर्षांत भारतातील २९ राज्यांपैकी २४ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांपैकी ४ प्रदेशांमध्ये प्रवास केला आहे. त्यांनी भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर या ९ देशांमध्ये डिसेंबर २०१८ पर्यंत ८ लक्ष कि.मी. प्रवास केला आहे.

१ आ. पर्वतरांगांमधून खडतर प्रवास करणेे

त्यांनी हिमालयातील शिवालिक, धौलधार, गढवाल, लडाख, पिरपंजाल, झंस्कार या पर्वतश्रेणी आणि गिरनार, विंध्याचल, अरावली, नीलगिरी आणि शेषाचल या पर्वतरांगामधून खडतर प्रवास केला आहेेे.

१ इ. भारतातील सप्तनद्यांचे दर्शन घेणे आणि पूजा करणे

त्यांनी आतापर्यंत ७ नद्यांचे दर्शन घेतले आहे. त्यांनी गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी आणि कावेरी, या ५ नद्यांच्या उगमस्थानी जाऊन पूजा केली आहेे.

१ ई. ३० शक्तीपिठांचे दर्शन घेणे

त्यांनी पृथ्वीवरील ५१ शक्तीपिठांपैकी ३० शक्तीपिठांचे दर्शन घेतले आहे. त्यांनी त्या ठिकाणी हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी पूजा किंवा याग केले आहेत.

१ उ. ४ धाम आणि १२ ज्योर्तिलिंगे यांचे दर्शन घेऊन पूजा करणे

त्यांनी जगन्नाथपुरी, रामेश्‍वरम्, बद्रिनाथ आणि द्वारका या चार धामांचे दर्शन घेतले आहे. सोमनाथ, श्रीशैलम्, उज्जैन, ॐकारेश्‍वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी, त्र्यंबकेश्‍वर, आैंढ्या नागनाथ, बैद्यनाथ, घृष्णेश्‍वर आणि रामेश्‍वरम्, या १२ ज्योर्तिलिंगांचे दर्शन घेऊन त्यांनी तेथे पूजा केली आहे.

१ ऊ. श्रीविष्णूच्या दिव्य स्थानांना भेट देणे

श्रीविष्णूच्या १०८ दिव्य स्थानांपैकी पृथ्वीवर (भारत आणि नेपाळ या देशांत) १०६ स्थाने आहेत. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आतापर्यंत ३८ ठिकाणांना भेट दिली आहे.

– श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (८.१२.२०१८)

 

२. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या
दैवी प्रवासाविषयी संतांनी काढलेले गौरवोद्गार !

२ अ. प्रवास करून आल्यावरही सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ यांचा तोंडवळा आनंदी दिसतो !

‘मला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेल्या प्रवासाविषयी पुष्कळ आश्‍चर्य वाटते. एवढा प्रवास करूनही त्यांना कधीही थकवा येत नाही. प्रवास करून आल्यावरही त्यांचा तोंडवळा नेहमी आनंदी असतो. मलाही ‘त्यांच्या समवेत दैवी प्रवासाला जावे’, असे वाटते.’ – प.पू. आबा उपाध्ये, पुणे, महाराष्ट्र.

२ आ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ स्वतः एक चमत्कार आहेत !

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची फार मोठी कृपा आहे. सामान्य मनुष्य २ – ३ दिवस सतत प्रवास करून आल्यावर आजारी पडतो किंवा विश्रांती घेतो; मात्र असे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या संदर्भात तसे घडत नाही. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ स्वतः एक चमत्कार आहेत !’’ – प.पू. रामभाऊस्वामी, तंजावूर, तमिळनाडू.

२ इ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ करत असलेला प्रवास
आणि तीर्थक्षेत्री जाऊन केलेल्या प्रार्थना यांमुळे साधकांचे रक्षण होईल !

‘सद्गुरु  (सौ.) अंजली गाडगीळ यांचा प्रवास हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी चालू आहे. त्यांचा प्रवास आणि त्यांनी तीर्थक्षेत्री जाऊन केलेल्या प्रार्थना यांमुळे सनातनच्या सर्व साधकांचे रक्षण होणार आहे. त्या ज्या-ज्या गावी जातील, त्या-त्या ठिकाणी असलेले साधक आणि त्यांची घरे यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होईल.’ – पू. (डॉ.) ॐ उलगनाथन्, चेन्नई, तमिळनाडू.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात