चंद्रपूर येथील भाजपचे नगरसेवक सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांचा वाढदिवस शास्त्रोक्त पद्धतीने साजरा

श्री. सुभाषभाऊ कासनगोट्टूवार

चंद्रपूर – येथील भाजपचे नगरसेवक आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांचा ५० वा वाढदिवस १३ डिसेंबर या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला श्री. कासनगोट्टूवार यांचे नातेवाईक, सनातन संस्थेचे साधक आणि समाजातील ४० हून अधिक नागरिक उपस्थित होते. या वेळी कासनगोट्टूवार यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास आलेल्या परिचितांना वर्ष २०१९ चे सनातन पंचांग भेट म्हणून दिले.

या वेळी सनातनच्या साधिका सौ. मंगला दर्वे यांनी शास्त्रानुसार वाढदिवस साजरा करण्याचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. श्री. कासनगोट्टूवार यांचे ५ सुवासिनीनींकडून औक्षण करण्यात आले आणि रामरक्षा म्हणण्यात आली. वाढदिवस साजरा होत असतांना श्री. कासनगोट्टूवार यांचा भाव जागृती झाला. प्रथमच असा वाढदिवस साजरा करत आहे. सनातन संस्थेच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात माझे  सदैव सहकार्य राहील, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सनातन संस्थेच्या वतीने त्यांना सनातनचा ग्रंथ भेट देण्यात आला.

क्षणचित्रे

१. श्री. कासनगोट्टूवार गेल्या ४ वर्षांपासून दैनिक सनातन प्रभातचे वाचक आहेत. त्यांनी एका वाचनालयामध्ये दैनिक चालू केले असून त्यांच्या विभागातील वाचनालयांमध्येही दैनिक सनातन प्रभात चालू करू, असे त्यांनी सांगितले.

२. उपस्थितांपैकी काहींनी सनातन संस्थेचे कार्य जाणून घेण्याची आणि संस्थेच्या उपक्रमात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

३. वाढदिवसानिमित्त श्री. कासनगोट्टूवार यांनी ३०० सनातन पंचांग त्यांच्या परिचितांना भेट म्हणून दिले.

४. वाढदिवस झाल्यानंतर त्यांच्या दारात गाय आणि वासरू आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात