सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई येथील भारत हिंदु मुन्नानीच्या कार्यालयात विशेष सत्संग

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सौ. सुगंधी जयकुमार

चेन्नई – सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच पटाल्लम, चेन्नई येथील भारत हिंदु मुन्नानीच्या कार्यालयात महिलांसाठी विशेष सत्संग घेण्यात आला. श्री. आर्.डी. प्रभु यांनी या सत्संगाचे आयोजन केले होते. सनातनच्या वतीने श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार उपस्थित होत्या. सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘साधनेचे महत्त्व, नामजप, आचारधर्म आणि समष्टी सेवेचे महत्त्व’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. श्री. आर्.डी. प्रभु यांच्या पत्नी सौ. श्रीदेवी यांनी साधनेविषयी शंकानिरसन करून घेतले. नामजप चालू करून १५ दिवसांनी असाच सत्संग परत आयोजित करण्याचे दायित्व त्यांनी स्वीकारले.

२. श्री. प्रभु यांनी स्थानिकांना या सत्संगाविषयी माहिती देणार असल्याचे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात