सनातनचे कार्य दीपस्तंभासारखे असून सर्वांना प्रेरणादायी !

‘गेली २६ वर्षे मराठी भाषेचे रक्षण करणे, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे, पाश्‍चात्त्य संस्कृतीला विराध करणे, हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराला विरोध करणे, मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवणे आणि मंदिरांचे रक्षण करणे, आदी क्षेत्रांत सनातन संस्था कृतीशील आहे. गोव्याच्या संस्कृतीला पूरक असे कार्य सनातन करत आहे. हिंदूंनी धर्माचरण करावे, हिंदु संस्कृतीचे पालन करावे आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे आदी हिंदूंच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी सनातन संस्था धडपड करत आहे. सनातनचे कार्य दीपस्तंभासारखे सर्वांना प्रेरणादायी आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हे एक ध्येय आहे आणि हे ध्येय पूर्ण होणारच आहे. सनातनचे धर्मप्रसाराचे कार्य वाढत असल्याने याला विरोधकांचा विरोध होणे स्वाभाविक आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे, हे एक षड्यंत्र आहे. सनातनविषयी खोटी वृत्ते प्रसिद्ध करून सनातन संस्थेची अपकीर्ती करणे, ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. सनातनला अपकीर्त करणारे स्वार्थी आणि हिंदुद्वेषी आहेत. असत्याचा कितीही धुरळा उडाला, तरी सत्य कधीही लपणार नाही.’

– श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, अध्यक्ष, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात