(म्हणे) ‘सनातन संघटनेकडून शस्त्रप्रशिक्षण दिले जाते !’ – प्रकाश आंबेडकर यांचा जावईशोध

सनातनवर बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी ‘स्वत:चे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे उघड झाले आहेत’, या होणार्‍या आरोपाविषयी प्रथम बोलावे !

मुंबई – सनातन संघटनेकडून शस्त्रप्रशिक्षण दिले जाते. तसा त्यांचा ‘ट्रेनिंग फोर्स’ कार्यरत आहे; मात्र याकडे लक्ष दिले जात नाही, असा जावईशोध भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लावला. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आल्यावर ‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मुलाखत देतांना ते बोलत होते. ‘सनातन, संघ यांच्याकडे असे शस्त्रप्रशिक्षण दिले जाते’, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात