विधान परिषदेत सनातन संस्थेच्या बाजूने शिवसेनेचे आमदार बोलतील ! – अनिल परब, गटनेते

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात आमदार अनिल परब यांना निवेदन

(उजवीकडे) आमदार श्री. अनिल परब यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

मुंबई, ३ डिसेंबर (वार्ता.) – समाजसाहाय्य आणि राष्ट्रहित यांचे कार्य करणारी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अन् अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना खोट्या प्रकरणांत गोवून बंदी आणण्याच्या, तसेच निष्पाप हिंदुत्वनिष्ठांच्या अटकेमागच्या षड्यंत्राची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते तथा आमदार श्री. अनिल परब यांना देण्यात आले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अरविंद पानसरे, अजय संभूस, सतीश सोनार उपस्थित होते. या वेळी श्री. परब म्हणाले, ‘‘सनातनवरील बंदीच्या विरोधात यापूर्वी मला सनातनचे लोक (साधक) भेटलेले आहेत. हा विषय मला ठाऊक आहे. विधान परिषदेत हा विषय चर्चेला आल्यानंतर शिवसेना सनातनच्या बाजूने बोलेल.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात