स्वभावदोषरूपी शत्रूशी लढण्यासाठी स्वयंसूचना सत्र करणे आवश्यक आहे ! – सौ. सविता लेले, सनातन संस्था

डोंबिवली, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – त्रेतायुगापासून द्वापरयुगापर्यंत जे युद्ध झाले, ते देशाबाहेरील आणि देशांतर्गत युद्ध झाले; पण आज कलियुगात आपल्याला स्वतःच्या अंतर्गत आणि बाहेरील स्वभावदोषरूपी शत्रूंशी लढायचे आहे. त्या दोषांशी लढायचे असेल, तर स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वयंसूचना सत्र करायला हवे. जोपर्यंत आपल्या अंतर्मनाला दोषांची जाणीव होत नाही, तोपर्यंत दोष जाणार नाहीत, असे मार्गदर्शन सनातनच्या साधिका सौ. सविता लेले यांनी येथे केले. डोंबिवली येथील सनातनच्या साधिका श्रीमती गर्दे यांच्या घरी घेण्यात आलेल्या साधना शिबिरात सौ. लेले यांनी हे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनिता मुळीक यांनी केले. या वेळी सनातनच्या साधिका सौ. शैला घाग यांनी ‘साधनेचे महत्त्व, साधना केल्यामुळे आपल्या जीवनात कसे पालट होतात, साधनेचे सिद्धांत कोणते, कुलदेवता आणि दत्त यांच्या नामस्मरणाचे महत्त्व’ याविषयी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात