नामजपाच्या साहाय्याने मानवी जीवनातील तणाव हाताळणे सहज शक्य ! – आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे

डॉ. मानसिंग शिंदे

सातवे (ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर), २८ नोव्हेंबर (वार्ता.) – सध्याच्या धावपळीच्या युगात मानवांना विविध तणावांना सामोरे जावे लागते. नामजपाच्या साहाय्याने मानवी जीवनातील तणाव हाताळणे सहज शक्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी २५ नोव्हेंबर या दिवशी ‘तणावमुक्त जीवनासाठी साधनेचे महत्त्व’, या विषयावर केले. येथील ग्रामदैवत ‘श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट’, यांच्या वतीने ब्रह्मलीन प.पू. भाऊसो पाटील स्मृती मासिक आरोग्य व्याख्यानमालेत प्रत्येक मासात एका विभागाचे तज्ञ आधुनिक वैद्य बोलावून व्याख्यान आणि चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत डॉ. संतोष निकम यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ५५ नागरिकांची उपस्थिती होती.

आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात तणाव म्हणजे काय ? त्याची कारणे आणि त्याचे दुष्परिणाम, मनाचे कार्य-नामजपाचे महत्त्व यांविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी उद्योजक श्री. आनंद पाटील यांनी सनातन संस्थेचे ग्रंथ, तसेच सनातनची नियतकालीके यांविषयी उपस्थितांना अवगत गेले.

 उपस्थित मान्यवर

सर्वश्री पांडुरंग पाटील, सतीश डुबल, पोपट सुतार, तानाजी कुंभार, निवृत्त मेजर अजित कणसे, पंढरपूर दिंडी सोहळा सातवे, आरळे, सावर्डे, बोरपाडळे, मांगले, देववाडी, ठाणपुडे येथील ग्रामस्थ

विशेष

आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी ‘पॉवर पॉईंट’ प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना विषयाची माहिती दिली, तसेच ३० डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या संदर्भातील ध्वनीचित्र-चकती दाखवून सर्वांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात